पुणे: संपूर्ण राज्यासह पुण्यातील (Pune) खड्यांमुळं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं जीव मुठीत घेऊन चालकांना वाहनं चालवावी लागत आहेत. अखेर पुण्यातील खराब रस्त्यांची यादी आली समोर असून ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते तात्काळ दुरुस्त करा, पुणे पोलिसांचे महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून पोलिस आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महापालिकेला पत्र दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे अपघात आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागत आहे. पोलिसांकडून पुण्यातील 24 प्रमुख भागात खड्डे असल्याचे पत्र देण्यात आले आहे. या पत्रा नंतर महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे
पुण्यातील कुठल्या भागात किती खड्डे (पोलिसांनी दिलेल्या यादीनुसार)
विभाग आणि खड्डे असणारे एकूण ठिकाणे
- कात्रज विभाग (आठ ठिकाणं)
- सहकारनगर ( तीन ठिकाणं)
- स्वारगेट (तीन ठिकाणं)
- सिंहगड रोड (दोन ठिकाणं)
- वारजे (तीन ठिकाणं)
- कोथरूड (तीन ठिकाणं)
- डेक्कन (तीन ठिकाणं)
- चतुश्रृंगी (तीन ठिकाणं)
- शिवाजीनगर (दोन ठिकाणं)
- खडकी (तीन ठिकाणं)
- येरवडा (सहा ठिकाण)
- विमानतळ (आठ ठिकाणं)
- कोरेगाव पार्क (चार ठिकाणं)
- लोणीकंद (दोन ठिकाणं)
- समर्थ (पाच ठिकाण)
- बंडगार्डन (12 ठिकाणं)
- लष्कर (1)
- वानवडी (सहा ठिकाणं)
- कोंढवा ( तेरा ठिकाणं)
- हडपसर ( 11 ठिकाण)
- मुंढवा (सात ठिकाण)
- लोणी काळभोर (दोन ठिकाण )
- सिंहगड रोड (चार ठिकाणं)