Rupali Thombare Patil on Pune Accident : पुण्यात विशाल अग्रवाल या बड्या उद्योगपतीच्या पोर्शो कारने दोन पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत मृत्यू झालाय. त्यात आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्याची सुटका केली आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलच तापू लागलय. याशिवाय या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी मध्यस्थी केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. मात्र, सुनील टिंगरेंनी सर्व आरोप फेटाळले असून मला माझ्या प्रतिमेवर डाग लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सुनील टिंगरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil ) यांनीही सुनील टिंगरेंचे समर्थन केले आहे. 


रुपाली ठोंबरे काय म्हणाल्या? 


रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुनील टिंगरेंबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्या लिहितात, पुण्यातील दोन तीन दिवसापूर्वी रात्री झालेला भीषण अपघात हा अत्यंत दुर्दैवीच होता,त्यात दोन जण मृत्युमुखी पडले हे अत्यंत भयान आणि धक्कादायक होते. मन सुन्न झाले,मृत्युमुखी पडलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यात आमचा आमदार सुनील भाऊने कोणत्याही कायदेशीर कारवाईत हस्तक्षेप केला नाही. तसेच कुठलाही राजकीय दबाव आणलेला नाही. सोशल मीडियावर जाणून बुजून चुकीचे सांगून ट्रोल केले जात आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे. 


सुनील भाऊ लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता


पुढे रुपाली ठोंबरे लिहितात, हो अपघात झाल्यानंतर अपघात झालाय असा फोन  आल्यानंतर आमदार सुनील भाऊ हे पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. परंतु तोपर्यंत सदर प्रकार कोणताच माहिती नव्हता. आरोपीचे वडील हे परिचयाचे असून सुनील भाऊ आमदार असल्याने जनता, मतदार असतील कुटुंब असेल मित्रपरिवार असेल यांना जेव्हा जेव्हा अडचणीत फोन येतात त्यावेळेला सुनील आण्णा हे नेहमीच धावून जातो. परंतु या मदतीच्या वेळी अपघात झालेले प्रकरण हे पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर कळाले. सदर प्रकार हा समोर आला त्याचवेळी आमदार सुनील भाऊ यांनी जी काय कायदेशीर कारवाई असेल ती पोलिसांनी करावी असे सांगून तेथून बाहेर पडले. जर दबाब आणला असता तर त्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला नसता. परंतु अपघाताची भीषण परिस्तिथी समजल्यावर पोलीस स्टेशन मधून माहिती घेवून बाहेर पडले. आमदार सुनील भाऊ टिंगरे यांच्या बद्दल जाणून बुजून चुकीचे पसरवले जात असून असा कोणताच कायदेशीर कारवाईत हस्तक्षेप, राजकीय दबाव आणलेला नाही. आणि आणू शकत नाही. आमदार सुनील भाऊ लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे आणि त्याने त्याचे काम कार्यरत ठेवावे ही विनंती आहे. सुनील भाऊ सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असं रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune Accident : मोदींच्या काळात न्यायदेखील श्रीमंतांचा गुलाम, ट्रक-बस ड्रायव्हरला जी शिक्षा ती पोर्श चालवणाऱ्या मुलाला का नाही? पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींची टीका