Pune Accident:  पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग (Pune Porsche Accident)  प्रकरणात मोठी माहिती हाती आली आहे. अल्पवयीन मुलाचे म्हणजेच लाडोबाच्या वडीलांनी डॉ. अजय तावरेला (Ajay Tavare) तब्बल 14 फोन कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने संकलन करताना डॉ. अजय तावरे दोन तासात तब्बल 14 वेळा अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलत होता, असं पोलिसांनी सांगितलं. विशेष म्हणजे कोणाला संशय येऊ नये म्हणून व्हॉट्सअॅप कॉल केले होते.  


ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी लाडोबाच्या वडिलांचे दोन तासांत 14 वेळा फोन


रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात दोन डॉक्टर अडकल्यानं ससून हॉस्पिलटची पुरती नाचक्की झाली आहे. या प्रकरणात  सर्वात कुतुहलाचा विशेष म्हणजे ब्लड रिपोर्ट... लाडोबाला वाचवण्यासाठी वडिलांनी डॉक्टरांना पैसे देऊन ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केली. विशेष म्हणजे ब्लड रिपोर्ट बदलण्याचा सल्ला डॉ. तावरेंनीच वडिलांच्या मुलाला दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल संकलनादरम्यान सुमारे दोन तासांत 14 वेळा अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलले होते.


ब्लड रिपोर्ट बदल्याण्याचा मुख्य प्लॅन डॉ. तावरेंचा


ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. रिमांडची मागणी करताना न्यायालयाने याबाबतची माहिती न्यायालयाला दिली आहे. तसेच डॉ. अजय तावरे याचाच ब्लड रिपोर्ट बदल्याण्याचा मुख्य प्लॅन होता, अशी माहिती मिळाली आहे.डॉ.  अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात  व्हॉट्सॲप कॉल झाला. संशय येऊ नये म्हणून नॉर्मल फोन कॉल न करता व्हॉट्सॲपचा वापर करण्यात आला. डॉ. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सॲप वरून संभाषण झाला आहे.  दोघांचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल रेकॉर्ड) वरून समोर आले आहे.  ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यात आला होता. त्यासाठी अल्पवयीन तरुणाचे वडील विशाल अग्रवाल याने ससूनमधील डॉ. अजय तावरेला व्हाटसॲप कॉल केला. 


पुण्यातल्या दुर्घटनेत ब्लड रिपोर्ट खूप महत्वाचा


पुण्यातल्या दुर्घटनेत ब्लड रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. तो पॉझिटिव्ह असेल तरच अग्रवालच्या दिवट्याविरुद्ध खटला मजबूत होणार आहे. अग्रवालचा दिवट्या आपल्या मित्रांसोबत पार्टी करतोय त्याचं सीसीटीव्ही पोलिसांना मिळालंय. पण पोलिसांनी मित्रांची कोणतीही टेस्ट केलेली नाही किंवा त्यांना साधं चौकशीलाही बोलावलं नाही. ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. 


हे ही वाचा :


Pallavi Saple : ससूनमध्ये डॉ. पल्लवी सापळेंच्या समितीसाठी चमचमीत बिर्याणीचा बेत, चौकशी होईपर्यंत कर्मचारी उपाशी