पुणे : पुणयातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात इन्स्टाग्राम वर रॅप सॉंग तयार करणारा तरुण चौकशीला गैरहजर राहिल्याचं समोर आलं आहे. या रॅप सॉंग प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने त्याला नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तो चौकशीसाठी गैरहजर राहिला आहे. पोलीस त्याच्यावर आता कोणती कारवाई करणार हे पाहणं, महत्वाचं ठरणार आहे.
पुणे पोर्शे कार अपघातात अनेक खुलासे समोर येत असातानच एक शिवीगाळ करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ बिल्डर पुत्राने केल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर या बिल्डरपुत्रावर अनेकांनी संताप व्यक्त केला. अनेक स्तरावरुन त्याला शिवीगाळदेखील करण्यात आली. जामीनावर सुटल्यावर त्याने हा व्हिडीओ केल्याचं बोललं गेलं. मात्र त्यानंतर हा व्हिडीओ दिल्लीतील एका कंटेन्ट क्रिएटरने केल्याचं समोर आलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आर्यन नाखरा या 22 वर्षीय मुलाने हा व्हिडीओ केल्याचं समोर आलं होतं.
मला प्रसिद्धी मिळवायची होती आणि फॉलोवर्स वाढवायचे होते. त्यात हे प्रकरण सगळीकडे चर्चेत होतं. त्यामुळे मी हा व्हिडीओ तयार केल्याचं आर्यनने एका ऑनलाईन फ्लॅटफ़ॉर्मला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होत. मात्र त्यानंतर दिल्लीत स्थायिक असलेल्या या आर्यनवर पोलिसांनी थेट गुन्हा दाखल केला. मी कंटेट क्रिएटर, पोलिसांनी गुन्हा मागे घ्यावा, मूळ प्रकरणातून सर्वांचं लक्ष दूर करु नये, अशी मागणी फेक व्हिडीओ बनवणाऱ्या आर्यनने केली होती.
'मी माझ्या सोशल मीडियावरिल स्टोरीजला पॅरोडी व्हिडीओ लावले होते. मीडियावाल्यांनी ती चोरी करुन त्यांच्या पेजवर सर्क्युलेट केले. त्यांनी सांगितलं मी दोघांचा जीव घेणारा क्रिमिनल आहे. माझ्यावर सेक्शन '41 अ' , 509 आणि 294 च्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचे सर्व लक्ष माझ्यावर केंद्रित करत आहेत. मूळ प्रकरणातून सर्वांचं दुर्लक्ष करता यासाठी हे सर्व सुरु आहे. तो करोडपतीचा मुलगा आहे, त्यामुळे हे सर्व करत आहेत. मी मध्यमवर्गीय मुलगा आहे. मला मारुन टाका, माझ्या जीवाची काही किंमत नाही. मी कोणाला व्यक्तीगत आई-बहिणीवरुन शिवी दिली नव्हती' असंही नाखरा म्हणाला होता.
इतर महत्वाची बातमी-