पुणे : पुणे पोर्शे कार अपघाताचे पुरावे गोळा करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. या अपघातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी, यासाठी पुणे पोलीस एक एक पुरव्याची माहिती घेत आहे. त्यातच आता या अपघाताची घटना AI द्वारे जिवंत करण्यात येणार आहे. पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर ज्या पोर्शे गाडीने हा अपघात झाला ती गाडी पोलिसांनी चांगली पॅक करुन ठेवली आहे. पोर्शे गाडीचे कॅमेरे तपासले जाणार आहे. पोर्शे गाडीचे तांत्रिक पुरावे नष्ट होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. 


ही पोर्शे कार येरवडा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहे. या पोर्शे कारचे अपघातात तुकडे झाले आहेय साधारण दीड कोटी या कारची किंमत आहे मात्र ही गाडी बिना नंबर प्लेटची पुण्याच्या रस्त्यावर धावत होती. या कारचा अपघात झाल्यानंतर कार येरवडा पोलिसांनी जप्त केली आता येत्या काळात पुण्यात पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे गाडीतील तांत्रिक गोष्टींना धोका निर्माण होऊ शकतो. गाडीतील पुरावे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे गाडीला पुणे पोलिसांनी पॅक करुन ठेवलं आहे. 


त्यासोबतच पोर्शे की कार कंपनी जर्मनीची आहे. त्यामुळे पोर्शेचे जर्मनीचे प्रतिनिधी पुण्यात येण्याची शक्यता आहे. जर्मन प्रतिनिधींकडून गाडीची पाहणी करण्यात येण्याची शक्यता आहे. हे प्रतिनिधी पुण्यात येऊन गाडीची माहिती घेतील. गाडीतील तांत्रिक बाबी तपासतील आणि गाडीतील कॅमेऱ्यासंदर्भातदेखील माहिती घेणार असल्याची माहिती आहे. हे प्रतिनिधी कधी येणार यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही आहे. आगामी पाऊस आणि इतर घटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांनी गाडीला पूर्णपणे झाकले आहे.


मर्सिडीजदेखील केली जप्त


त्यासोबतच काल या प्रकरणात सुरेंद्व अग्रवाल यांनी ड्रायव्हरला डांबून नेणारी मर्सिडीज कार पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. कार क्रमांक एमएच 12 पीसी 9916 ही गाडी पुण्यातील संगमवाडी बोट क्लब रोड या ठिकाणच्या एमएस एसीए रिसॉर्ट नावाने नोंदणीकृत आहे. गाडीवर मुंबई येथे 23 जानेवारी 2024 रोजी झेब्रा क्रॉसिंग उल्लंघनाची सीसीटीव्ही माध्यमातून दीड हजार रुपये दंडाची पावती आहे. तर 19 फेब्रुवारी 2024 रोजी पुण्यात देखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी झेब्रा क्रॉसिंग उल्लंघनाची 500 रुपयांची दंड पावती पुणे वाहतूक पोलिसांनी केलेली आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरेंनी आणखी एक चुकीचा अहवाल दिला? मुलानी-शेख कुटुंबाने कुंडली बाहेर काढली, चौकशी समिती हे पण तपासणार का?