पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात रोज (Pune Porsche Car Accident) नवनवे खुलासे समोर येत आहे. बिल्डर मुलासह त्याचे वडिल आणि आजोबाला अटक करण्यात आली आहे. त्यातच आता पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाने एका पार्टीचं बिल 48 हजार रुपये दिल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता बारावीला 60 टक्के मिळाले म्हणून या पार्टीचं नियोजन करण्यात आलं होतं. साधारण 20-25 जणांना सोबत घेऊन ही पार्टी केली आणि काही तासात चक्क 48 हजार उडवल्याचं समोर आलं आहे. 


अपघाताच्या दिवशी या सगळ्यांनी पार्टी केली. त्यानंतर सगळेच साधारण दोनच्या सुमारास घरी निघाले. त्यावेळी बिल्डर पुत्र त्याचा ड्रायव्हर आणि त्याचे दोन मित्र एका गाडीने घरी जाण्यासाठी निघाले असता भरधाव वेगाने हुल्लडबाजी करत पोर्शे कारने निघाले असता टुव्हिलरला जोरात धडक दिली आणि यात टूव्हिलरवरील दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा अपघात पाहून कल्याणी नगर परिसरात जमाव जमला आणि त्यांनी सतरा वर्षीय मुलाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर हा अल्पवयीन मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालचा मुलगा असल्याचं समोर आलं.


या प्रकरणी आता कडक पोलीस तपास सुरु आहे. आजोबा आणि वडिल विशाल अग्रवालने मुलाला प्रचंड वाचवण्याचा प्रयत्न केला. 15 तासात जामीन मंजूर करुन घेतला. त्यानंतर सगळीकडून पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सगळीकडून संतापाची लाट उसळली. राजकीय नेत्यांनीदेखील या प्रकरणावरुन पुणे पोलीस आणि सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर बिल्डर पुत्राला थेट बाल हक्क मंडळात बोलवून त्याची पुन्हा एकदा चौकशी केली आणि त्यानंतर त्याला थेट १४ जूनपर्यंत बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. 


हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर या प्रकरणात सतरा वर्षीय मुलाच्या हाती कोट्यावधी रुपयांची चावी दिल्याने त्याचे वडिल विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल केला आणि तो अल्पवयीन असल्याने त्याला पबमध्ये एट्री देऊन दारु सर्व्ह केल्याने बार मालकासह बार टेन्डरवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात त्याच्या आजोबांनीदेखील त्याचा बचाव करण्यासाठी ड्रायव्हरला डांबून ठेवल्याने आणि त्याचे छोटा राजनसोबत संबंध असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Porsche Car Accident : घर, बार, अपघात स्थळ सगळे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच बाहेर येणार