Pune Car Accident : पुण्याच्या कल्याणीनगर भागात दोघांना चिरडाणाऱ्या अल्पवयीन मुलाचा ताबा हा बेकायदेशीर असल्याचं सांगत त्याला तातडीने मुक्त करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या. भाच्याच्या सुटकेसाठी आत्याने कोर्टात याचिका दखल केली होती. त्यानंतर एका महिन्यानंतर अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायलयानं मुक्त करण्याचे आदेश दिलेत. जामीन देताना मुंबई उच्च न्यायलयानं नेमकं काय म्हटलं? हे संपूर्ण प्रकरण काय? हे प्रकरण चर्चेत कसं आलं? याचा आढावा घेऊया, 


अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलानंतर या प्रकरणात मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी आणि अजोबा सुरेंद्र अग्रवार यांना अटक करण्यात आली. तसंच ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी देखील या प्रकरणात अटक करण्यात आली. 21 जून रोजी विशाल अग्रवालला जमीन मंजूर करण्यात आला. तर अल्पवयीन मुलाला 25 जून रोजी बालसुधारणागृहातून मुक्त करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेत.


उच्च न्यायलयानं काय म्हटलं? 


जामीन मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा मुलाला ताब्यात घेणं हे बेकायदेशीर  आहे. बालसुधारगृहाच्या कस्टडीतून त्या मुलाला तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली. अल्पवयीन मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. 


ज्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवून दोघांना चिरडलं त्या अल्पवयीन मुलावरही आघात झाला आहे. त्याला थोडा वेळ द्यायची गरज आहे. भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या प्रकरणात हे मत मांडलं आहे. पुणे पोलिसांनी नेमकं काय केलं? या मुलाला अटक करण्यात आल्यानंतर जामीन कसा काय मिळाला? याकडेही या न्यायमूर्तींनी लक्ष वेधलं. 


पोर्शे अपघात प्रकरण चर्चेत कसं आलं? 


दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दोघांचा जीव घेतल्यानंतर या अल्पवयीन आरोपीला अवघ्या 15 तासात जामीन मिळाला होता. तसंच त्याला निबंध लिहण्याची शिक्षा देण्यात आल्यानं हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. पोलिसांनी काही तासातच आरोपीला पुन्हा बालसुधारणागृहात पाठवलं. तर मंगळवारी या मुलाची सुटका करण्यात आली आहे. 


19 मे रोजी पुण्याच्या कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारने एका बाईकला धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण आलं. कोर्टाने आरोपीला निंबध लिहण्याची शिक्षा दिला होता. तसेच पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर मिळाला. त्यानंतर हे  प्रकरण संपूर्ण देशात चर्चेत आलं होतं. 


Special Report VIDEO : अल्पवयीन मुलाला तात्काळ मुक्त करा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश



ही बातमी वाचा: