मुंबई कल्याणीनगर भागात रविवारी (Pune Porsche Car Accident)   मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असून, त्याची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणात स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचं नाव जोडलं जातंय. त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचीही चर्चा आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी   स्पष्टीकरण दिल्यानंतरही जनतेचा रोष कायम आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते  अंबादास दानवे  (Ambdas Danve) यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार  सुनील टिंगरे  (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार  सुनील टिंगरे सांगतात की  मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे.  तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून गेला असेल तर मला काही प्रश्नांची उत्तरे द्या, असे अंबादास म्हणाले.

  


अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया एक्स (पूर्वीचे ट्विटर)  वर एक पोस्ट केली आहे.  आमदार  सुनील टिंगरे  सांगतात की मी दबाव टाकला नाही. मग एका फोनवर  एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी कितीवेळा असे मध्यरात्री पोलिस ठाण्यात पोहचले आहात?    तुम्ही पोलिस ठाण्यात मध्यरात्री का गेला होता ?  प्रकरणाची माहिती फोनवर घेतली जाते अनेकदा अशा वेळी. यासाठी थेट ठाण्यात कोणासाठी आणि कशासाठी गेले होते? याची उत्तरे खरं तर अजित पवारांनी दिली पाहिजे.  


सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप


पुणे अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी केला होता. त्याानंतर हे प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. टिंगरे हे मध्यरात्री पोलीस ठाण्यात कशासाठी गेले होते असा सवाल विचारण्यात आला होता. यावर टिंगरे यांनी स्पष्टीकरण देखील दिले. तरी देखील स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव घेतलं जातंय.  याप्रकरणी पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुणेकरांकडून केला जातोययावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली. भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक तितकाच भ्रष्ट आमदार, अशी टीका देखील केली.


अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. तर सुनिल टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवारांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करून मंगळवारी दुपारी कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणात आतापर्यंत अजित पवारांची कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच सुनील टिंगरे हे मध्यरात्री येरवडा पोलीस स्टेशनमध्ये होते, त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप होत आहे.  


हे ही वाचा :


'मेरा बच्चा अच्छा था.. त्याची काही चूक नव्हती,त्याला अमानुषपणे का मारलं?' अनिसच्या आईचा काळजाचं पाणी करणारा आक्रोश