Ravindra Dhangekar on Pune Porsche Accident: पुणे : काँग्रेसचे (Congress) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) डीनची भेट घेतली. दबावाला बळी पडू नका अशी सूचना त्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना केली. तसंच मंत्र्यांच्या जवळचे असल्याने डॉक्टर तावरेंना पद मिळालं, असा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर बोलताना म्हणाले की, "ससून रुग्णालयातील डीनची आज मी भेट घेतलीय. याप्रकरणी तुमच्यावर कुणाचाही दबाव आला, तर त्याला बळी पडू नका. हा संपूर्ण समाजाचा विषय आहे, हा देशातील नागरिकाचा विषय आहे. लवकरात लवकर तुम्ही चौकशी पूर्ण करून अहवाल द्या. चुकीच्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मी विनंती केली."
"पोलिसांकडून लाखो रुपये जप्त केले आहेत. डॉ. तावरे विरोधात याआधी पण आक्षेप होते. तुमच्यावर दबाव आला तरी, तुम्ही दबावाला बळी पडू नका, असं डीन यांना सांगितलं आहे. डॉ. तावरे मंत्र्याच्या जवळचे असल्यानं पद मिळालं, रात्री दोन वाजता डॉ. तावरे ब्लड रिपोर्ट बदलतो. हे किती भयानक आहे. रक्ताच्या रिपोर्टमध्ये फेरफार झाली.", असं धंगेकर म्हणाले आहेत. तसेच, माझ्यावर स्टंट करत असल्याचे आरोप केले जातात, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पुण्यात ससून हॉस्पिटलमधील एक कर्मचारी नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. रक्त चाचणी विभागातील कर्मचारी बेपत्ता असल्याची चर्चा आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळतेय. मात्र कोणीही बेपत्ता नाही असा दावा पोलिसांनी केलाय. Cctv फुटेज मध्ये दिसणाऱ्या सर्व संबंधितांना चौकशीसाठी
बोलावणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. चौकशीला येणार नाहीत, त्या सर्वांना घेऊन येणार आणि चौकशी करणार असं उपायुक्तांनी म्हटलंय.
ससून रूग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा : सुप्रीया सुळे
ससून रूग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. ससून रूग्णालय हे पुणे जिल्ह्यात रूग्णसेवेत अव्वल कामासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही घटना पाहता रूग्णालयाच्या नावाला डाग लागलाय. त्यामुळे ससून भोवती असलेलं संशयाचं धुकं काढण्यासाठी उपाययोजना करा, श्वेतपत्रिका काढा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलीय.
ससून रुग्णालयातील प्रकरणी चौकशीसाठी SIT, पल्लवी साबळे एसआयटीच्या प्रमुख
अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलणारे दोन डॉक्टरांना अटक केली असून या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. डॉ. पल्लवी सापळे या एसआयटीच्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. मात्र त्यांच्या नियुक्तीवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यावर पल्लवी सापळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी नियुक्ती वैद्यकीय शिक्षण विभागाने केली असून शासनाच्या निकषाप्रमाणे चौकशी होईल, असं डॉ. सापळे यांनी सांगितलं.