पुणे : पुण्यात दारुड्या पोरानं दोघांचे (Pune Accident News) बळी घेतल्याच्या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय. सोशल मिडीयावर पोलिसांवर यथेच्छ टीका होतेय. या प्रकरणात विधी संघर्ष मुलाचा ब्लड रिपोर्ट (Blood Report) सध्या मोठ्या कुतूहलाचा विषय ठरला. त्यात ब्लड रिपोर्ट बदलल्याने नेमके कोणाचे ब्लड सॅम्पल दाखवले हा प्रश्न अनुत्तरीत होता. अखेर ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलाचे बदललेले ब्लड सॅम्पल हे एका महिलेचे असल्याचं चौकशी समितीच्या अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र हे सॅम्पल मुलाच्या आईचे असल्याची चर्चा रंगली आहे.
कल्याणीनगर अपघातानंतर 19 मे रोजी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी दुसरेच रक्ताचे नमुने दिले होते. त्यामुळे त्या रक्तचाचणीत कोणताही दोष आढळून आला नव्हता. मात्र, अनेक दिवस जे रक्त पोलिसांना देण्यात आले होते ते कुणाचे होते, हा प्रश्न अनुत्तरित होता. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बुधवारी अहवाल सादर केला. त्यात मुलाचे रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचे समोर आली आहे.
ब्लड सॅम्पलची अदलाबदल
पुण्यातल्या दुर्घटनेत ब्लड रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. तो पॉझिटीव असेल तरच अगरवालचा धनिक पुत्राचा खटला मजबूत होणार आहे. मात्र लाडोबाला तब्बल नऊ तासांनी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी धनिकपुत्राने मद्यप्राशन केले आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, त्यानंतर घडलेला चक्रावणारा आणि धक्कादायक प्रकार समोर आला. ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोन वरिष्ठ डॉक्टरांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे.
मुलाची आई बेपत्ता
पोलिसांकडून मुलाची आई शिवानी अग्रवाल यांची देखील चौकशी होणार असल्याचे समजते. त्यातच, आता शिवानी अग्रवाल बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरला धमकूल्याप्रकरणी क्राइम ब्रांच टीमकडून शिवानी अग्रवाल यांचा देखील तपास करायचा आहे. त्यामुळे, पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने त्या सध्या बेपत्ता आहेत. तर, शिवानी अग्रवाल यांचा फोन देखील बंद आहे. त्यामुळे, मुलाची आई व विशाल अग्रवाल यांच्या पत्नी नेमकं कुठं गायब झाल्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
कसे बदलले रक्ताचे नमुने?
नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले. डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाच्या Forensic Medicine And Toxicology विभागाचे प्रमुख आहेत. तर डॉक्टर श्रीहरी हरलोल हे अपघात विभागात चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. श्रीहरी हरनोळ यांच्या विभागाने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले. मात्र, त्यामध्ये मद्याचा अंश सापडू शकतो, हे लक्षात आल्यावर दोन्ही डॉक्टरांनी धनिकपुत्राच्या रक्ताचे सॅम्पलच बदलायचे ठरवले. त्यासाठी रजेवर असलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी हस्तक्षेप केला. डॉक्टर अजय तावरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. मात्र, तरीही तावरे यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धनिकपुत्राच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल करायला सांगितली. या अल्पवयीन मुलाच्याऐवजी दुसऱ्याच एका रुग्णाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुढे करण्यात आले. मात्र, पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबमध्ये पाठवून DNA टेस्ट करायचं ठरवलं आणि डॉक्टरांचं बिंग फुटले.
Video :