पुणे :  माझा मुलगा मला परत द्या... माझा मुलगा मला सोडून गेला त्याची काय  चूक होती... त्याची काहीच चूक नव्हती तरी माझ्या मुलाची काय चूक होती की त्याला एवढ्या अमानुषपणे का मारले? मेरा बच्चा अच्छा था... असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात (Pune Porsche Car Accident)  बळी गेलेल्या  अनिस अवधियाच्या (Anis Awdhiya Mother) आईचा होता. अनिसच्या आईचा आक्रोश पाहून कोणाच्याही काळजचे  पाणी होईल. अवधिया  कुटुंबांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी केलेली कारवाई आणि कोर्टानं आरोपीला दिलेला तातडीचा जामीन, यामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये संतापाचं वातावरण आहे.


 एएनआय वृत्तसंस्थेशी अनिस अवधियाच्या आईने संवाद साधला. त्यावेळी तिच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.  " माझा मुलगा तीन वर्षापासून पुण्यात होता. तो अतिशय गुणी होता.  आमच्यापासून दूर असला तरी आमची काळजी घ्यायचा. रविवारी  रात्री 3 वाजता मला त्याच्या मित्रांचा फोन आला. त्याचे मित्र म्हणाले, काकू  अनिसच्या बाबांना फोन द्या आम्हाला त्यांच्यशी बोलायचे आहे. अनिसचा अपघात झाला तो सिरिअस आहे. लवकर या... आम्ही इतक्या दूर होतो कसं जाणार ... त्यानंतर काही वेळातच त्या मृत्युची खबर आली. तो माझी, त्याच्या लहान भावाची  तसेच पूर्ण कुटुंबियांचा आधार होता. मला माझा मुलगा परत द्या... ", असे म्हणत अनिसच्या आईन हंबरडा फोडला.


अनिसचे परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न अर्धवट राहिलं........


अनिसचे वडिल म्हणाले, अनिस हा पुण्याच्या एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता. अपघाताच्या अगोदरच तो दुबईवरून परत आला होता. तो परदेशात जाण्याची स्वप्न  पाहत होता. अनिस ऑफिसला सुटी असल्याने पार्टीसाठी गेला होता. रात्री 2.30 ते 3.00 च्या सुमारास तो पार्टीवरुन घरी परतत होता. त्यावेळी त्याचा अपघात  झाला.त्याच्या मित्रांनी त्याच्या आईच्या मोबाईलव कॉल केला. त्यावेळी आम्हाला घटनेची माहिती मिळाली.  अनिस परदेशात नोकरीला जाण्याची स्वप्न पाहत होता.   आमच्या कुटुंबाचा  आधार गेला. आमच्या मुलांना  त्रास झाला. 


माझ्या निष्पाप मुलीला न्याय मिळालाच पाहिजे : आश्विनीची आई


तर आश्विनीची आई म्हणाली,   जिथे पैसा असतो तिथे कारवाई होत नाही. न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा आमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल.    अश्विनी खूप हुशार होती.  लॉकडाऊनच्या काळात तिला नोकरी मिळाली होती. एका श्रीमंत बापाच्या मुलाच्या चुकीने आम्ही आमची लेक गमावली. एखाद्याच्या मुलाच्या हुल्लडबाजीची शिक्षा आमच्या मुलीला मिळाली. माझ्या निष्पाप मुलीला न्याय मिळालाच पाहिजे.  


Video :