पुणे : भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी  (Rajya Sabha Election) तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी  (Medha kulkarni)  आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. यात सगळ्यात जास्त चर्चा रंगत आहे ती म्हणजे मेधा कुलकर्णी यांच्या नावाची. मागील काही महिन्यांपासून भाजवर नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज भाजपने या चर्चांना पूर्ण विराम दिला आणि मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांना उमेदवारी देण्याने भाजप पाच मोठे डाव साधणार आहे. त्यांना उमेदवारी देण्याची पाच महत्वाची कारणं कोणती आहेत?, पाहूयात...


1. मेधा कुलकर्णी या कोथरूड विधानसभेतून आमदार राहिल्या आहेत. मात्र 2019 ला त्यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर ब्राह्मण उमेदवार नसल्याच्या चर्चा रंगल्या. त्यांना थेट राज्यसभेची उमेदवारी देऊन कोथरुड विधानसभेचा चंद्रकांत पाटलांचा मार्ग मोकळा केला आहे. 


2. पुणे लोकसभेसाठी भाजपकडून अनेक नावं चर्चेत आहे. मात्र या लोकसभेसाठी भाजप जगदीश मुळीक यांना उमेदवारी देण्याची तयारी करु शकतात. मेधा कुलकर्णी या कोथरुडच्या आहेत. चंद्रकांत पाटीलदेखील कोथरुडमधून निवडून येतात. जगदीश मुळीक हे वडगावशेरी मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपसाठी वडगावशेरी मतदार संघदेखील आणखी मजबूत होईल. 


3. मेधा कुलकर्णी या प्राध्यापिका आहे. उच्चविद्याविभूषित असलेला चेहरा संसदीय राजकारणामध्ये भाजपला उपयोगी ठरु शकतो. 


4. मेधा कुलकर्णी याचं कार्य आणि त्यांनी आतापर्यंत मांडलेल्या भूमिका पाहिल्या तर त्या स्पष्टवक्ता आहे. त्यासोबतच त्या आक्रमक भूमिक घेण्यासाठी ओळखल्या जातात. राजकीय आणि सामाजिक भूमिका मांडताना त्या कायम तत्पर असल्याचं पाहायला मिळालं आहे. याआधी त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे वाददेखील निर्माण झाले आहेत. मात्र त्यांच्या आक्रमकपणासाठी त्या ओळखल्या जातात. 


5. कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या वेळी ब्राह्मण उमेदवार नसल्याचं ब्राह्मण समाज नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र मेधा कुलकर्णींना उमेदवारी देऊन भाजपने ब्राह्मण उमेदवाराचादेखील डाव साधला आहे. 


नाराजीच्या चर्चा झाल्या पण बोलणं पसंत केलं नाही...


भाजपकडून मेधा कुलकर्णी  यांना राज्यसभेसाठी  उमेदवारी जाहीर करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून त्या भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी पक्षातील नेत्यापेक्षा वेगळ्या भूमिकादेखील घेतल्या होत्या. त्यानंतर आज त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे जुन्या किंवा बाकी कोणत्या गोष्टींवर बोलण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं म्हणत त्यांनी जुन्या नाराजीवर बोलणं पसंत केलं नाही. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Medha Kulkarni : भाजपवर असलेली नाराजी दूर झाली का? राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?