IAS Pooja Khedkar: राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत असतानाच आता या प्रकरणामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase IAS) याचं देखील नावं घेण्यात आलेलं होतं. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी आपला मानसिक छळ (Mental Torture) केल्याची तक्रार पूजा खेडकरने केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याची तक्रार पूजा खेडकरने केली. पुजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशीम पोलिसांकडे दाखल केली होती. त्यानंतर ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली आहे. पुणे पोलिस याच्या कायदेशीर बाबी तपासत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी पुजा खेडकरला तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले असल्याची माहिती समोर आली आहे..


पुणे पोलिसांनी पुजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. पुजा खेडकरने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशीम पोलिसांकडे दाखल केली आहे. ती तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुजा खेडकरचा नव्याने जबाब नोंदवायचं ठरवलं आहे. त्यासाठी पुजा खेडकरला पुणे पोलिसांनी आज जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. पुणे पोलिस दलातील महिला अधिकारी पुजा खेडकरचा जबाब नोंदवणार आहेत. त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीबाबत काय करायचं याचा निर्णय घेण्यात येणार आहे.


पूजा खेडकरने (IAS Pooja Khedkar) पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी छळ केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी आता पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावलं आहे. पूजा खेडकरने वाशिम पोलिसांकडे छळ झाल्याची तक्रार दिली होती. हा प्रकार पुण्यातील असल्यामुळे पुढील चौकशीसाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे. त्यासाठी वाशिम पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झालं आहे. आता याबाबतची चौकशी पुणे पोलीस करणार असल्याची माहिती आहे.



सुहास दिवसे यांनी छळ केल्याचा पूजा खेडकरचा आरोप 



खेडकरची (IAS Pooja Khedkar) प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. या काळात दिवसे यांनी तिचा छळ केल्याचा आरोप खेडकरने केला आहे. खेडकरने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर वाशिम पोलिसांनी सोमवारी चौकशी केली. खेडकर यांनी नोंदविलेल्या जबाबामध्ये जिल्हाधिकारी दिवसे (Suhas Diwase) यांनी छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील असल्याकारणाने ही तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली.


आपल्या मागण्यांमुळे राज्यासह देशभरात पूजा खेडकर चर्चेत


जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिणार्थी असताना खेडकरने आपल्या कारला अंबर दिवा लावला. कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. त्यांनी बैठकीसाठी स्वतंत्र दालन, तसेच शिपाईही घेतले. प्रशिक्षणार्थी असताना या सर्व मागण्यांमुळे चर्चेत आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तक्रार केली. याचा अहवाल जिल्हाधिकारी दिवसे यांनी राज्य सरकारकडे पाठवला. त्यानंतर खेडकरची वाशिम येथे बदली करण्यात आली. खेडकर यांनी दिवसे यांच्याविरोधात छळवणूक केल्याची तक्रार वाशिम पोलिसांकडे दाखल केली आहे. त्याचा तपास आता पुणे पोलिस करणार आहेत.