Pune Police : पुण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलने दुसऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला (Pune Police Constable)  जीवे मारण्यासाठी सराईत गुंडाला सुपारी देण्याचा प्रकार समोर आला आहे. ज्याने सुपारी दिली तो पोलीस कॉन्स्टेबल नितीन दुधाळ हा पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून काम करतो तर ज्याच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती तो दिनेश दोरगे हा दत्तवाडी पोलीस ठाण्यात कामास आहे.  

Continues below advertisement


दोघाही गेल्या अनेक वर्षांपासून मित्र असून एकाच भागात राहतात.  मात्र काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद होऊन त्या वादातून दुधाळ याने दोरगेला मारण्यासाठी योगेश अडसूळ नावाच्या सराईत गुन्हेगाराला सुपारी दिली.  त्यानंतर योगेश अडसुळ हा दोरगेचा पाठलाग करु लागला.  त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपल्याला दुधाळने सुपारी दिल्याचे म्हटलं आहे.  


त्यानंतर पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात नितीन दुधाळ आणि योगेश अडसुळ विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  योगेश अडसुळला अटक करण्यात आली असून नितीन दुधाळ मात्र गुन्हा नोंद झाल्यापासून गायब झाला आहे.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha







 



इतर महत्वाच्या बातम्या