पुणे : सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत होत असताना, पिंपरी चिंचवडमधील हत्या सत्र सुरूच आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 9 च्या सुमारास पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. भर रस्त्यात सिमेंट ब्लॉक ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सुनील सगर (वय, 35) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.


सुनील सगर हा युवक जीव वाचविण्यासाठी चिखलीमधील एका दुकानात धावला होता. पण आरोपीने तिथे सर्वांदेखत अमानुषपणे मारहाण सुरूच ठेवली. त्यानंतर दुकानातून बाहेर येताच सीमेंट सिमेंट ब्लॉकने ठेचून सुनील सगर या युवकाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण, पिंपरी चिंचवडमधील हत्या सत्र काही केल्या थांबत नसल्याने हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


मागच्या काही दिवसात सातत्याने पिपंरी चिंचवडमध्ये हत्येच्या घटना घडत आहेत. 18 डिसेंबरला पिंपळेगुरवरमध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यामध्ये योगेश जगताप या तरुणाची हत्या करण्यात आली होती.  गोळीबार केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरील दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली होती. त्यानंतर 22 डिसेंबरला तळेगावमध्ये इंस्टाग्रामवरील स्टेटस प्रकरणावरुन अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दशांत परदेशी असं हत्या जालेल्या 17 वर्षीय मुलाचे नाव होते. एका बंद पडलेल्या कंपनीसमोर मुलाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला पेलवान नागेश कराळेवर दहा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. खेड तालुक्यात ही घटना घडली होती. हा सर्व प्रकार देखील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. त्यानंतर 31 डिसेंबरच्या रात्री घडलेली हत्येची घटना. दरम्यान, गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 4 हत्येच्या घटना घडल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: