Koyta Gang : सिंहगड विधी महाविद्यालयाजवळील  (Koyta gang) खाऊ गल्लीत  (Pune Crime News) विक्रेत्यामध्ये दहशत माजवणाऱ्या दोघांना पकडणाऱ्या दोन पोलिसांचा पोलिस आयुक्त रतेश कुमार यांनी नुकताच सत्कार केला. पोलिस आयुक्तांनी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील या पोलिस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.


सिंहगड कॉलेज परिसरातील खाऊ गल्लीत दहशत निर्माण झाली होती. चॉपर घेऊन आलेल्या दोन तरुणांनी खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली. यामुळे वाहनचालकांसह नागरिकही हैराण झाले होते. आरोपींनी एका तरुणाला चॉपरने जखमी केले होते. त्यावेळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील हे गस्त घालत होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले त्यांनी दोन तरुणांचा पाठलाग करून एकाला पकडले.


या पाठलागाचे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले. पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईची पोलिस आयुक्त रतेश कुमार यांनी दखल घेतली. पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत इंगवले व पाटील यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर, राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा हे उपस्थित होते.


दहशत रोखण्याचं पुणे पोलिसांसमोर आवाहन


कोयता गॅंगच्या दहशतीचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यांनी या सगळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा किंवा तडीपार करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांनी पहारा देण्यास सुरुवात केली होती. मात्र ही गॅंग शहरातील सगळ्यात परिसरात सक्रिय झाली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना या गॅंगवर कारवाई करण्याचं मोठं आव्हान आहे. 


कोयतेच जप्त...


पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. यामुळे पुणे पोलिसांनी थेट कोयता विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकला आहे. पुण्यातील  भोरी आळी या परिसरात अनेक लहान-मोठे दुकानं आहेत. याच परिसरातील दुकानावर छाटा टाकला आहे आणि  दुकानातून नवीन विक्रीसाठी ठेवलेले 105 कोयते जप्त केले. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुण्यात सर्रास कोयते उगारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गॅंगची दहशत सर्रास सुरु आहे. शहरातील अनेक मध्यवर्ती तसेच उपनगरात तरुणांकडून भरदिवसा कोयते उगारले जात आहेत. या तरुणांमध्ये अनेक अल्पवयीन तरुण असून गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांमध्ये भीती पसरली आहे.