Pimpri Hit and Run  : पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad)  परिसरात हिट अँड रनचे (Hit And Run)  प्रकार वाढत असताना पोलिस मात्र झोपी गेलेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. सातत्याने घडणाऱ्या घटनांनंतरही त्यावर वेळीच कारवाई केली जात नाही.  पिंपरी गावात  असाच हिट अँड रनचा प्रकार (Pune Hit And Run Case) समोर आला आहे. कार चालकाकडून रस्त्याच्याकडेने जाणाऱ्या महिलेला कारने ठोकरले. कार अंगावर घातल्यानंतर कारचालक पसार झाला आहे.   त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
 
पिंपरी चिंचवडमध्ये हिट ऍण्ड रनचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. सुदैवाने यात एक महिला थोडक्यात बचावल्या आहेत, मात्र त्या जखमी झाल्यात. पिंपरी गावात हा प्रकार काल दुपारी घडला. रस्त्याच्या बाजूने चाललेल्या महिलेला कारने समोरून येत ठोकरले. त्यानंतर कार चालक पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो हाती लागला नाही. आता पिंपरी पोलीस त्या चालकाचा शोध घेत आहे.


व्हिडीओनंतर नागरिकांकडून संताप


ही धडक इतकी जोराची होती की यात रस्त्यावरुन चालत चाललेल्या महिला  यात गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटना कधीची आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही .  अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या व्हिडीओनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  


पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय?


पुण्यातील कल्यानीनगर अपघातात पोलिसांची पोलखोल झाली होती. त्यातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काहीच धडा घेतला नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. कारण एकामागोमाग एक हिट अँड रनचे प्रकार समोर येत आहेत. मात्र पिंपरी चिंचवड पोलिस यातील चालकांना वाचवण्यासाठी वेगवेगळे 'कार'नामे करताना दिसतायेत. त्यामुळं पोलिस आयुक्त विनयकुमार चौबेंच्या अखत्यारीत असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय? चौंबेंचा पोलिसांवर वचक राहिला नाही का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. 


Watch Video : पिंपरीत हिच अॅन्ड रनचा थरार



हे ही वाचा :


Vasai Drunk And Drive : माणसं तर मरतातच, आता मुक्या जनावरांचा जीवही धोक्यात, दारू पिऊन कुत्र्याच्या अंगावर घातली गाडी