या सर्वांचा मंगळवारी रात्री 8 वाजता प्रवास सुरु झाला पण पुण्यातील वडगाव मावळ पोलिसांनी बुधवारच्या सकाळी 9 वाजता त्यांना नाकाबंदीत अडवलं. तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना उपाययोजना कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर चालक आणि त्या कुटुंबियास निवारा केंद्रात ठेवण्यात आलं आहे.
धक्कादायक... पुण्यात 15 होम क्वॉरंटाईन एकत्रित प्रवास करताना आढळले
नाजिम मुल्ला, एबीपी माझा | 02 Apr 2020 10:48 AM (IST)
हातावर शिक्के मारून होम क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र असं असताना हे कुटुंब एकाच गाडीतून प्रवास करताना आढळून आलं.
पुणे : होम क्वॉरंटाईनचे शिक्के असणारे 15 व्यक्ती एकाच वाहनातून प्रवास करत असल्याचे समोर आलं आहे. पुण्यातील वडगाव मावळ पोलिसांनी ही बाब उघडकीस आणली. उस्मानाबाद येथून हे कुटुंब मुंबईमधील अंधेरीला निघालं होतं. जनता कर्फ्युच्या रात्री एका पाहुण्याच्या अंत्यविधीला हे कुटुंब उस्मानाबाद जिल्ह्यात गेलं होतं. मात्र तातडीने महाराष्ट्र लॉकडाऊन आणि नंतर थेट भारत लॉकडाऊन करण्याचे आदेश निघाले. त्यामुळं या कुटुंबाच्या हातावर शिक्के मारून होम क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र होम क्वॉरंटाईन पूर्ण होण्याआधी तिथंच थांबण्याचे आदेश असताना ही हे कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना झालं. बर्थडे सेलिब्रेशनसाठी बाहेर पडलेल्या तरुणींची पोलिसांसोबत हुज्जत भारत लॉकडाऊन असताना नको त्या कारणासाठी हजारो तरुण पाहिले असतील पण पिंपरी चिंचवडमध्ये दोन तरुणी चक्क बर्थडे साजरा करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. वाकड पोलिसांनी त्यांना याबाबत जाब विचारला असता या तरुणींनी हुज्जत घातली. तरुणींची पोलिसांसोबतची भाषा ऐकून सर्वांनाच धक्का बसला. शेवटी गुन्हा दाखल करा असं महिला पोलीस अधिकारी म्हणाल्या असता तरुणींनी माफी मागण्याची भूमिका घेतली. याव्यतिरिक्त पोलिसांनी 54 दुचाकी ताब्यात घेत तरुणांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं.