पुणे : पुण्यातील खेड राजगुरूनगर एसटी स्टँडवर विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. दोन गट एकमेकांमध्ये भिडल्याची दृश्य आता समोर आली आहेत. एका महिलेने पोलीस आल्याची बतावणी केल्यानं प्रकरण थोडक्यात शमलं. नेमका हा प्रकार का घडला याचा तपास खेड पोलीस करतायेत. मात्र शिक्षण घेण्याच्या वयात विद्यार्थ्यांमध्ये अशी गुन्हेगारी फोफावत आहे ही चिंतेची बाब आहे.


पुण्यातील खेड राजगुरूनगर एस टी स्टँडवर हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ चांगला व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अनेक विद्यार्थी दिसत आहे. या विद्यार्थ्यांमध्ये नेमका राडा कशावरुन झाला हे स्पष्ट झालं नाही आहे. मात्र एकमेकांचं पाहून अनेक विद्यार्थी एकत्र आले आणि एकमेकांवर भिडल्याचं दिसत आहे. या मुलांच्या राड्यामुळे बस स्टॅंडवर काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. हे पाहून कोणीही या राड्यामध्ये पडून राडा सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र त्यानंतर याच बसस्टॉपवरली एका महिलेने राडा सोडवण्यासाठी शक्कल लढवली. पोलीस आले, पोलीस आहे असं भर स्टॅंडवर ओरडली. हे ऐकताच मुलांनी राडा थांबवला आणि आपल्या कामाला निघाले. 


विद्यार्थ्यांचा टोलनाक्यावर राडा, व्हिडीओ व्हायरल... 


दोनच दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांचा असाच राडा टोल नाक्यावर बघायला मिळाला होता. पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) टोल नाक्यावर तुफान राडा झाला. जुन्नर तालुक्यातील आळे फाटा लगतच्या टोल नाक्यावर हा धक्कादायक प्रकार घडला होता. विद्यार्थी आणि टोल नाक्याचे कर्मचारी हे एकमेकांशी भिडले होते. शाळेच्या बसला टोल मगितल्याचा कारणावरून हा प्रकार घडला होता. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची अरेरावी ही सर्वश्रुत आहेच, पण विद्यार्थ्यांनी असं वर्तन भररस्त्यात करणं हे सर्वांसाठीच धक्का देणारं होतं. त्यामुळंच हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहचताच, पोलिसांनी देखील टोल नाक्यावर धाव घेतली. मात्र, अद्याप टोल नाक्यावरील यंत्रणेने अथवा शाळा प्रशासनाने ही पोलिसांकडे कोणतीही तक्रार दिलेली नाही. परंतु असा प्रकार घडल्याची कबुली मात्र टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आळे फाटा पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे या राड्यामागे टोलचा मुद्दा होता की आणखी काही हे अद्यापही खात्रीशीरपणे समोर आले नाही. 


इतर महत्वाची बातमी-


Pune news : एकदा ठरवलं तर शेतकरी मागे हटतच नाही, रायरेश्वर किल्ल्यावर ट्रॅक्टर नेला, पार्ट खोलून पायवाटेने गड गाठला!