Pune News : पर्यटकांनी कायम गजबजलेल्या किल्ले सिंहगडावर (Sinhgad) गुढीपाडव्याच्या (Gudhipadwa) दिवशी (2 एप्रिल) पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत किल्ल्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.
पुणे आणि परिसरातील अनेकांचा शनिवार-रविवारच्या वीकएण्डचा कार्यक्रम काय, असे विचारल्यास, सिंहगडावर जायचे आहे, हे उत्तर हमखास मिळेल. पण उद्या सिंहगडावर एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पहाटे पाच ते दुपारी 12 पर्यंत किल्ल्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. , असे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
लष्कराचं दक्षिण मुख्यालय आणि इंद्रायणी बालन फौंडेशनकडून उद्या सकाळी पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर ' नरवीर तानाजी रन ' या क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत लष्करातील 200 धावपटू जवान आणि 160 नागरी खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत सिंहगड किल्ला वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. ही स्पर्धा राजगड किल्ल्याच्या पायथ्यापासून सुरु होणार असून सिंहगड किल्ल्यावर या स्पर्धेचा समारोप होणार आहे. खेळाडूंना कोणता अडथळा येऊ नये यासाठी सिंहगड किल्ल्यावर सामान्य नागरिकांना पहाटे सहा ते दुपारी बारा या वेळेत येण्यास मनाई असणार आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून हे आदेश दिलेत.
या कार्यक्रमानिमित्त लष्करातील वरिष्ठ अधिकारी व काही महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. रुग्णवाहिका, लष्कराच्या ट्रक व अधिकाऱ्यांची वाहणे येणार असल्याने त्यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha