(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : पुण्यातील देहूत आजपासून पुन्हा मांस, मच्छीविक्रीस बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई
Pune Dehu News Update : पुण्यातील देहूत आजपासून पुन्हा एकदा मांस, मच्छी विक्रीस (Non Veg) बंदी घालण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांची ही नगरी असल्यानं तसा निर्णय नगरपरिषदेने घेतला.
Pune Dehu News Update : पुण्यातील देहूत आजपासून पुन्हा एकदा मांस, मच्छी विक्रीस (Non Veg) बंदी घालण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांची ही नगरी असल्यानं तसा निर्णय नगरपरिषदेने घेतला. याआधी ग्रामपंचायत असताना ही त्याची अंमलबजावणी सुरू होती. त्यानंतर नवनिर्मित देहू नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्व साधारणसभेत हा निर्णय घेतला. फेब्रुवारीत एकमुखाने मंजुरी दिलेल्या ठरावाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. याआधी ग्रामपंचायतीने सुद्धा हा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि कोरोनाचाही काळ सुरू झाला.
त्यामुळे प्रशासक असताना मांस, मच्छी विक्री सुरू झाली. पण ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले, जानेवारीत निवडणूकही झाली. त्यानंतरच्या पहिल्याच सर्वसाधारणसभेत पुन्हा एकदा मांस, मच्छी विक्रीवर बंदीचा निर्णय झाला. एकमताने मंजूर झालेल्या ठरावाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या या देहू नगरीत मोठ्या संख्येने भाविकांची मांदियाळी सुरू असते. एकादशी असो आषाढी वारी सोहळा इथं वैष्णवांचा मेळा पाहायला मिळतो. या सर्वांचा विचार करता देहू नगरीत मांसाहार विक्री होऊ नये, अशी मागणी अनेकदा केली जायची. म्हणूनच इथं ग्रामपंचायत असताना ही हा निर्णय घेतला गेला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणीही सुरू होती. मात्र ग्रामपंचायतीमधील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला, त्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त झाली.
अशातच कोरोनाचा ही काळ सुरू झाला. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मांसाहारावर अनेकांनी भर दिला. त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक बसले असताना मांस, मच्छी विक्री सुरू होती. पण ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले, जानेवारीत निवडणूक ही झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आली. त्यानंतरच्या पहिल्याच सर्व साधारण सभेत पुन्हा एकदा मांस, मच्छी विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव पुढे आला.
या ठरावाला सर्वपक्षीयांनी एकमुखाने संमती दिली. फेब्रुवारीत झालेल्या निर्णयाची कल्पना मांस, मच्छी विक्रेत्यांना देण्यात आली. 31 मार्चची या विक्रेत्यांना मुदत देण्यात आली होती आणि आजपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. आता याचं कोणी उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तशी माहिती देहू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधवांनी दिली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi : छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! अजिंक्य शंभूराजांचा पराक्रमी इतिहास
- Covid19 Restrictions : आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त; दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही
- Viral Video : समुद्रात पोहताना महिलेच्या कानात शिरला खेकडा, पुढे काय झालं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल