लोणावळा, पुणे : लोणावळ्यात अन्न विषबाधेमुळे तब्बल 150 शेळी आणि मेंढ्यांचा (Lonavala News) मृत्यू झाल्याची (Goats and Sheep) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यावेळी  मेंढ्यांनी कुजलेले किंवा खराब झालेले अन्न पदार्थ (Food poisoning) खाल्याने ही विषबाधा झाली आहे. यामुळे अनेक मेंढपाळांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. लोणावळा येथे एका मोकळ्या मैदानात मेंढपाळ आपल्या शेळ्या आणि मेंढ्या घेऊन आला होता. त्यावेळी या सर्व शेळ्या मेंढ्यांना चरण्यासाठी सोडण्यात आले होते. 



मोकळ्या मैदानात मेंढपाळ आपल्या शेळ्या आणि मेंढ्या घेऊन गेले असता या शेळ्या मेंढ्यांनी कुजलेले किंवा खराब झालेले अन्न पदार्थ त्याठिकाणी खाल्ले. त्यानंतर त्या मेंढ्यांना त्रास होऊ लागला. तातडीने त्या ठिकाणी पशुधन अधिकारी व पशु वैद्यकीय अधिकारी यांना बोलवण्यात आले. डॉक्टरांनी या शेळ्या मेंढ्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र काही शेळ्या मेंढ्या उपचारापूर्वीच तर काही उपचारादरम्यान मृत्युमुखी पडल्या. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या  प्राथमिक तपासात या 150 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू हा अन्न विषबाधेमुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. 


मेंढपाळ्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर


लोणावळा परिसरातील अनेक मेंढपाळ हे उदनिर्वाह शेळ्यांवरच करतात. त्यामुळे या परिसरात अनेकदा मोठ्या प्रमाणात मेंढ्या दिसतात. उदनिर्वाह चालत असल्याने आणि एकाचवेळी एवढ्या प्रमाणात मेंढ्या आणि शेळ्या दगावल्याने मेंढपाळांना धक्का बसला आहे. आपल्या मेंढ्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्यामुळे अनेक मेंढपाळ्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. 


प्राण्यांवर विषबाधा होण्याची कारणं


प्राण्यांना विषबाधा होण्याची अनेक कारणं आहेत. त्यात महत्वाचं कारण म्हणजे कुजलेलं अन्न खाणं. हे आम्ल जनावरांच्या पोटात गेल्यामुळे जनावरे अस्वस्थ होतात व त्यांना श्वासोच्छवासांत अडथळा निर्माण होतो.डोळे विस्फारून आणि फेफरे येऊन जनावरे मरण पावतात. डोळे लाल होणे,काळा बुरशीयुक्त कडबा जनावरांच्या खाण्यात आल्यास,रब्बी गहू- हरभरा पिकांत वाढणारे ढोरकाकडा नावाचे तण जनावरांनी खाल्ल्यास हे या विषबाधेचे लक्षण आहे. मात्र यातून प्राण्यांना वाचवण्यासाठी काही उपायही आहे. त्यात ज्वारीचे फुटवे असलेल्या शेतात जनावरांना चरण्यास सोडू नये.विषबाधा झालेल्या जनावरांस तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मदत घेऊन उपचार करणं, या उपयांचा समावेश आहे. 


इतर महत्वाची बातमी-