Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पुणे शहरात गेल्या 24 तासात 87 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 160 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात कोरोनाबाधीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून पुण्याबाहेरील एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या 177 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या मुंबईत 1175 सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत 5,02,985 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे शहरात दिवसभरात 87 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ तर 160 रुग्णांना डिस्चार्ज. आज 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू यात पुण्याबाहेरील एकाचा समावेश आहे. दरम्यान, 177 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 502985 झाली असून पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1175 आहे.
आज दसऱ्यानिमित्ताने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. गणपती बाप्पाला सोन्याचे अलंकार घालण्यात आले आहेत. आज साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. कलाकार प्राजक्ता गायकवाड हिनेही आज मंदिरात येऊन बाप्पाच दर्शन घेतलं.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आज माळेगांव सहकारी साखर कारखान्याचा 65वा गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष रमेश थोरात , संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित.
विजयादशमी निमित्त पुण्यातील देवाच्या आळंदीत उत्साह पहायला मिळतोय. मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आलाय. संत ज्ञानोबांच्या गाभाऱ्यातील सजावट ही भाविकांचं मन प्रसन्न करत आहे. माऊलींचे हे रूप भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहे.
पुणे शहरात काल नव्याने 103 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 5 लाख 2 हजार 898 इतकी झाली आहे.शहरातील 123 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 92 हजार 590 झाली आहे. पुणे शहरात काल एकाच दिवसात 7 हजार 75 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 34 लाख 62 हजार 680 इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या1 हजार 249 रुग्णांपैकी 177 रुग्ण गंभीर तर 228 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
पुण्यात रिक्षाची भाडेवाढ करण्यात आली आहे. 8 नोव्हेंबर 2021 पासून रिक्षा भाडेवाढ लागू होणार आहे. यासंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन आधिकारी यांनी पत्र काढले आहे. पहिल्या दीड किलोमीटरला सध्या 18 रुपये भाडे घेतले जायचे ते आता 20 रुपये असेल,तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला आता 12.19 पैसे घेत होते ते आता नवीन नुसार 13 रुपये घेण्यात येणार आहेत. काल पुण्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत पुणे,पिंपरी चिंचवड व बारामती प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थितीत होते. आता या भाडेवाढीमुळं आता पुणेकरांना डिझेल पेट्रोल गॅस नंतर आता ऑटो रिक्षावाढ दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
पुण्यात आज पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज पुण्यात 34 पैशांनी पेट्रोल महागलं आहे. काल पुण्यामध्ये पेट्रोल 109.91 रुपये लीटर होते. आज 110.25 असा प्रतिलीटर दर झाला आहे. पुण्यामध्ये डिझेल 99.55 रुपये प्रतिलीटर दराने मिळत आहे.
पार्श्वभूमी
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पुण्यात रिक्षाची भाडेवाढ
पुण्यात रिक्षाची भाडेवाढ करण्यात आली आहे. 8 नोव्हेंबर 2021 पासून रिक्षा भाडेवाढ लागू होणार आहे. यासंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन आधिकारी यांनी पत्र काढले आहे. पहिल्या दीड किलोमीटरला सध्या 18 रुपये भाडे घेतले जायचे ते आता 20 रुपये असेल,तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला आता 12.19 पैसे घेत होते ते आता नवीन नुसार 13 रुपये घेण्यात येणार आहेत. काल पुण्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत पुणे,पिंपरी चिंचवड व बारामती प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थितीत होते. आता या भाडेवाढीमुळं आता पुणेकरांना डिझेल पेट्रोल गॅस नंतर आता ऑटो रिक्षावाढ दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
पुण्यात काल दिवसभरात 103 नवे कोरोनाबाधित
पुणे शहरात काल नव्याने 103 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 5 लाख 2 हजार 898 इतकी झाली आहे.शहरातील 123 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 92 हजार 590 झाली आहे. पुणे शहरात काल एकाच दिवसात 7 हजार 75 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 34 लाख 62 हजार 680 इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या1 हजार 249 रुग्णांपैकी 177 रुग्ण गंभीर तर 228 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
पुण्यात पेट्रोल 34 पैशांनी महागलं
पुण्यात आज पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज पुण्यात 34 पैशांनी पेट्रोल महागलं आहे. काल पुण्यामध्ये पेट्रोल 109.91 रुपये लीटर होते. आज 110.25 असा प्रतिलीटर दर झाला आहे. पुण्यामध्ये डिझेल 99.55 रुपये प्रतिलीटर दराने मिळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -