Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 25 Oct 2021 08:02 AM
गंगाराम आई माता मंदिराजवळ लागलेली आग आटोक्यात, कुलींगचे काम सुरू

गंगाराम आई माता मंदिराजवळ लागलेली आग आटोक्यात आलेली आहे. घटनास्थळी कुलींगचे काम सुरू आहे. या गोडाउनमध्ये जवळजवळ दोन कोटी रुपयाचं सामान होतं. पण या आगीच्या घटनेत पूर्ण जळून खाक झालेलं आहे. 

पुण्यात श्रीजी लॉन्स येथे एका गोडाऊनला आग, अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल


पुण्यातील  गंगाधाम, आई माता मंदिराजवळ, श्री जी लॉन्स येथे एका गोडाऊनला आग लागली आहे. अग्निशमन दलाची  10 अग्निशमन वाहने  घटनास्थळी दाखल झाली असून  आग विझवण्याचे काम सुरु आहे. 

किरण गोसावीवर फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

किरण गोसावीवर फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यात एक महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोसावीने शरण येण्या संदर्भात कोणताही संपर्क पुणे पोलिसांशी साधलेला नाही. पुणे पोलिसांच्या दोन टीम राज्याबाहेर त्याच्या शोध घेत आहेत.

पुण्यात करण्यात आले भीक मागो आंदोलन

पाण्याची गुणवत्ता तपासून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोग शाळेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर शासनाने खाजगीकरणाची कुराड चालवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत असा आरोप करत आज राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला. आज भूजल भवन येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणानी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अकरा महिन्याचे नियुक्ती आदेश संपुष्टात आल्यानंतर पुनर्नियुक्ती आदेश न देता कालावधी संपलेल्या कर्मचाऱ्यांना काम करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी तपासणी प्रयोगशाळा बंद पडल्या आहेत. दिवाळी तोंडावर आल्यानंतरही पुनर्नियुक्ती आदेश व थकीत चार ते पाच महिन्याचे मानधन न मिळाल्याने आज भीक मागो आंदोलन केलं आहे. 

नगरसेवकाने उखडला सायकल ट्रॅक  

वाहतुकीला अडथळा ठरत असलेला हडपसर येथील उड्डाणपूलाजवळील सुमारे दोनशे मीटर लांबीचा सायकल ट्रॅक एका नगरसेवकाने जेसीबी यंत्राच्या साह्याने उखडून टाकला आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही अडचणीचा ठरत असलेला हा ट्रॅक पालिकेकडून  काढला जात नसल्याने ही कृती करावी लागल्याचे या नगरसेवकाने सांगितले.नगरसेवक योगेश ससाणे यांनी याबाबत वारंवार निवेदने देवून प्रशासनाकडे हा ट्रॅक काढून रस्ता रूंद करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज जेसीबी लावून हा संपूर्ण ट्रॅक उखडून टाकला आहे.

पुणे शहरात 50 लाखांपेक्षा अधिक जणांना लस

Corona vaccination in pune : पुणे शहरात 50 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यामध्ये 65 टक्के नागरिकांना मोफत लस देण्यात आली आहे. तर 35 टक्के लोकांना लसीसाठी पैसे मोजले आहेत.  

पुणे कोरोना अपडेट

पुणे कोरोना अपडेट : रविवार दि. २४ ऑक्टोबर, २०२१


◆ उपचार सुरु : ८९३
◆ नवे रुग्ण : ७१ (५,०३,८०४)
◆ डिस्चार्ज : १०३ (४,९३,८३९)
◆ चाचण्या : ५,०६१ (३५,१७,१४०)
◆ मृत्यू :  २ (९,०७२)

पार्श्वभूमी

पार्श्वभूमी


पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान गोंधळ



पुणे आझम कॅम्पस आबेदा इनामदार कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी आरोग्य विभागाची परीक्षा सकाळी दहा वाजता सुरू होणे अपेक्षित होती. मात्र या ठिकाणी झालेल्या गोंधळानंतर ही परीक्षा साडेअकराच्या सुमारास सुरू करण्यात आली. या केंद्रावर स्वतः पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आरोग्य विभागाचे उपसंचालक संजोग कदम पोचल्यानंतर ही परीक्षा सुरू करण्यात आली.. मात्र विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या केंद्रावर कुठलंही नियोजन या परीक्षेसाठी करण्यात आलं नव्हतं असा आरोपी विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी पोचले आहेत..


पिंपरी चिंचवड सेंटरमध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ



जिजामाता इंग्लिश स्कूल पिंपरी चिंचवड सेंटरमध्ये आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांना अवैद्यकीय सहाय्यक पेपर कोड 35 न देता इतर पदांचे 28, 39 व इतर पदांचे पेपर देण्यात आले, सदर बाबत विद्यार्थ्यांना अवैद्यकीय सहाय्यक पेपर कोड 35 नुसार पदासाठी अर्ज केले होते परंतु प्रत्यक्ष पेपर विद्यार्थ्यांना इतर पदांचे पेपर देण्यात आले हा प्रकार पर्यवेक्षकांना निदर्शनास आणून दिला होता. परंतु त्यांनी सदर चुकीचा पेपर विद्यार्थ्यांना दिला तोच पेपर तुमचा आहे असे सांगण्यात आले. 



सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून, बापाला तीन तासात केले जेरबंद



बारामती तालुक्यातील पारवडी येथे बापाने सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाने वनविभागाच्या झाडीत लपलेल्या आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली. पोलिसानी  सावत्र मुलाचा खुन करुन पसार झालेला आरोपी 3 तासाच्या आत अटक करुन जेरबंद  केला आहे.


शेतात पिकवला गांजा, पोलिसांकडून दोघांना अटक



पुणे शहर पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलने दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी त्यांच्या शेतावर गांजाचे उत्पादन करून त्याची विक्री केली आहे. पोलिसांनी 11 लाख रुपये किमतीच्या गांजाची एकूण 250रोपे जप्त केली आहे.  




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.