Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
गेल्या 6 वर्षात तिप्पट दर आधीच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर लावले आहेत. आतापर्यंत अतिरिक्त 8 लाख कोटी गोळा केले तेव्हा राज्यातील भाजप कुठे होतं? लोकसभेच्या पोटनिवडणुका होतात तेव्हा दर कमी होतात. आताही यूपी च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे दर कमी होताहेत का? आमदार रोहित पवारांचा सवाल
पिंपरी चिंचवड वाल्हेकरवाडी 3 ते 4 जणांच्या टोळक्याचा राडा. वाल्हेकरवाडी परिसरातील रस्त्यालगत पार्क केलेल्या 8 वाहनांची केली तोडफोड. मिनी बस,कार या वाहनांचे नुकसान. ही तोडफोड करून हे आरोपी फरार झालेत. पोलोसांकडून शोध सुरू
पार्श्वभूमी
सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकार्याच्या घरात चोरी, 43 लाख 50 हजार रूपयाचा ऐवज लंपास
शहरात सर्वत्रच दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच एक बातमी समोर आली आहे. पुण्यात मुंढवा परिसरात राहणार्या महसूल विभागातील एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकार्याच्या घरात चोरी झाली आहे. चोरटयांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच रात्री साडेआकरा वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मी पूजनामध्ये ठेवलेले तब्बल 150 तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच लाख रूपये असा एकूण 43 लाख 50 हजार रूपयाचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांचे चिरंजीव सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे. गुरूवारी लक्ष्मी पूजन असल्याने दत्तात्रय डोईफोडे यांनी घरातील जवळपास सर्वच पारंपारिक दागिने पूजनामध्ये ठेवले होते. त्यामध्ये मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, बांगडया, तोडे, ब्रेसलेट, पाटल्या तसेच हिर्याचे सेट आणि रोख रक्कम 2 लाख 50 हजार रूपयांचा समावेश होता. एकुण 150 तोळे वजनाचे दागिने आणि 2 लाख 50 हजार रूपये रोख असा एकूण 43 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज पुजनामध्ये ठेवण्यात आला होता. डोईफोडे यांचे घर गुरूवारी रात्री 11.30 ते शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरटे बंगल्याचे गेटचे कुलूप तोडून व हॉलचे खिडकीचा गज कापून आत प्रवेश केला. आणि पूजनामधील सर्व दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 43 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी चोरटयांचा शोध घेत आहेत...
पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात पावसाची हजेरी
पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. दिवाळीत फटाके फोडणाऱ्यांच्या आनंदावर पाणी. फटाके फोडणाऱ्यांनी धरली घरची वाट. अचानक पाऊस आल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -