Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 01 Nov 2021 07:17 AM
पुण्यात गेल्या 24 तासात 71 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 79 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 71 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 79 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 494481 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 731 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 5239 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

लोहगाव विमानतळ पुन्हा सुरू; प्रवाशांची गर्दी वाढली

लोहगाव विमानतळ दुरुस्तीच्या कामासाठी मागील पंधरा दिवस बंद होतं. नंतर ते 31 तारखेपासून पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे आता विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. दिवाळीचेनिमित्त साधून बाहेर जाण्यासाठी आणि पुण्यात येण्यासाठी प्रवाशांची विमानतळावर मोठी गर्दी होत आहे. 



पुण्यातील द पूना मर्चंट चेंबर्स यांचे 'मेघा किचन'; 33 वर्षापासून ना नफा ना तोटा तत्वावर फराळ

पुण्यातील द पूना मर्चंट चेंबर्सकडून गेल्या 33 वर्षापासून ना नफा ना तोटा तत्वावर फराळ तयार केला जातो. तसंच पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एक मेघा किचन तयार करण्यात आलंय. याठिकाणी एक लाख किलो लाडू आणि एक लाख किलो चिवडा तयार केला जात आहे. 

वसुबारस निमित्त देवाची आळंदी सजली; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला आकर्षक सजावट

वसुबारस निमित्त पुण्यातील देवाची आळंदी सजली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलीये. गोमतेच्या प्रतिकृती लाऊन गाभारा सजविण्यात आलाय.



पार्श्वभूमी

पुण्यातील बालेवाडीत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळला; अग्निशमन दलाच्या 6 फायरगाड्या घटनास्थळी दाखल



बालेवाडी, पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. काही जण जखमी किंवा अडकल्याची प्राथमिक माहिती असून पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 6 फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दल पोहोचण्यापुर्वी 12 जणांना  जखमी अवस्थेत दवाखान्यात नेले असल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत. या बिल्डिंगचा रात्री स्लॅब( काँक्रीट भरण्याचं) काम सुरु होतो त्यावेळी अचानक स्लॅब कोसळले. रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली त्यावेळी या बिल्डिंगचा काम सुरू होतं आणि बारा कामगार काम करत होती. या दुर्घटनेत आठ कामगार जखमी झाले आहेत तातडीने त्यांना रात्री जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. रात्री पोलिसांना देखील घ्या संदर्भात माहिती देण्यात आली होती.


 सावरकरांना सोडवण्यासाठी गांधींनी प्रयत्न केले: शरद पोंक्षे



स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबाराव सावरकर अंदमानात असताना त्यांचे धाकटे बंधू नारायण सावरकर त्यावेळी इथे होते. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे होते. नारायण सावरकर यांनी गांधींना विचारलं दोन्ही बंधू अडकलेत त्यांना सोडवण्यासाठी तुम्ही काही करु शकता का? त्यावर गांधीजी म्हणाले, तुम्ही तुमच्या मार्गाने प्रयत्न करा, मी माझ्या मार्गाने करतो. गांधींनी सावरकरांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले, याचे पुरावेही आहेत. काँग्रेसवाल्यांना हे माहितीही नसेल की, सावरकांना सोडवायला गांधींनी प्रयत्न केलेत. अभ्यास नसल्याने काहीही बोलतात, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. 


 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.