Pune Suicide : भाजपच्या माजी (Suicide)पदाधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. वारजे येथील त्यांनी आपल्याच कार्यालयात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संजय ज्ञानोबा बराटे असं या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव होतं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बराटे यांचे वारजे एनडीए रोडवर (Warje NDA Road) घर आहे. त्याच इमारतीमध्येच त्यांचे कार्यालय आहे. बराटे हे शुक्रवारी आपल्या कार्यालयात होते. त्यांची पत्नी शुक्रवारी सायंकाळी कार्यालयात गेल्या. तेव्हा संजय बराटे यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. कार्यालयात पोलिसांनी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. वारजे पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीनं केली होती आत्महत्या
यापूर्वी पुण्यात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या काही नेत्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात मनसेतून शिंदे गटात दमदार एन्ट्री घेतलेले नेते निलेश माझिरे (Nilesh Majhire) यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केली होती. विष प्राशन करुन त्यांच्या पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याने सगळीकडे खळबळ उडाली होती. पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. राहत्या घरात पत्नीने विष प्राशन केलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निलेश माझिरे यांनी मनसेतून शिंदे गटात प्रवेश घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांनी शिंदे गटात एन्ट्री घेतली होती.
आत्महत्येत वाढ झाल्याचं घटनांमधून समोर
पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील इतर शहरात आत्महत्येत वाढ झाली आहे. सर्व क्षेत्रास सुरु असलेली स्पर्धा यासाठी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. मात्र या आत्महत्येमागची कारणंदेखील क्षुल्लक असल्याचं आतापर्यंतच्या घटनेतून समोर आलं आहे. त्यात जर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी किंवा राजकीय कार्य करत असलेल्या नेत्याने आत्महत्या केली तर अनेक प्रश्नांना तोंड फुटतं. त्याच कोणाशी काही वादावादी झाली का? किंवा आत्महत्या नसून घातपात आहे का?, असे प्रश्न उपस्थित केले जातात. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्याने कार्यलयातच गळफास घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :