पुणे: लोणावळा येथील कैवल्य धाम या संस्थेच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अलिबाग तालुक्यातील रांजणखार गावामध्ये असणाऱ्या एकूण 30 एकर जागेची मोजणी आज भूमिअभिलेख यांच्यामार्फत करण्यास सुरूवात झाली. मात्र, कैवल्य धाम संस्थेच्या विरोधात रांजनखार ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रांजनखर ग्रामस्थांचा जागा मोजणीला विरोध केला आहे.  एक हजार ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. महिलांचा देखील मोठा समावेश यामध्ये आहे. 'कैवल्य धाम चले जाव', आमचा ताबा आमची मालकी आशयाचे पोस्टर बनवून गावकऱ्यांचा संस्थेविरोधात एल्गार पुकारला आहे. 


नेमकं प्रकरण काय?


लोणावळा येथील कैवल्य धाम या संस्थेच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अलिबाग तालुक्यातील रांजणखार गावामध्ये असणाऱ्या एकूण 30 एकर जागेची मोजणी आज भूमिअभिलेख यांच्यामार्फत करण्यास सुरूवात झाली. मात्र, रांजणखार ग्रामस्थांनी या मोजणीला तीव्र विरोध करत ही मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक हजाराहून अधिक ग्रामस्थांनी या संस्थेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत कैवल्य धाम चले जाव, आमचा ताबा आमची मालकी अशा आशयाचे फलक बनवून जोरजोरात या संस्थेच्या विरोधात घोषणा देत आक्रमक भूमिका घेतली आहे. काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण निवळले आहे. 


ग्रामस्थांचा कैवल्य धाम संस्थेविरोधात का आहे विरोध?


सन 1941 साली बिवलकर यांनी कैवल्य धाम या संस्थेस (लिज डीडने) 99 वर्षांच्या करारावर एकून 10 एकर जागा दिली होती. या जागेत गोशाळा, महिला कार्यशाळा,आणि इतर सुविधा उपलब्ध होण्याकरिता देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात या जागेत काहीच झालं नाही. ग्रामस्थांना विश्वासात न घेता 10 एकर ऐवजी 15 एकरचा सातबारा फसवून तयार करण्यात आला. या जागेत 1988 सालापासून स्थानिकांना घरे बांधण्यासाठी प्लॉट वाटप करण्यात आले. 2005 पासून या जागेचा पुन्हा वाद चिघळला आणि हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. आता या जागेत काही ग्रामस्थांनी घरे बांधली आहेत. पुन्हा आजपासुन या जागेत कोर्टाकडून संस्थेच्या अर्जनंतर जागेची मोजणी सुरू झाली आहे, त्याला गावकऱ्यांचा विरोध सूरु झाला आहे.