पुणे : कोरोनाची बाधा असलेल्या महिलेची यशस्वी प्रसुती पुण्याच्या ससून रुग्णालयात करण्यात आली. बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करुन दिली आहे. बाळाचे जन्म झाल्यानंतर त्याचे स्वॅबचे नमुने घेतले असून कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आली आहे. महिलेने जन्म दिलेले बाळ मात्र कोरोनामुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे.


या नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेची ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी केली. कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती करण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. एकीकडे कोरोनाचे युद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनी या नव्या जीवाचाही मार्ग सुकर करुन दिला. कोरोनाच्या संकटातील जगातील ही सातवी प्रसूती ठरली. यापूर्वी चीन, लंडन, ऑस्ट्रोलिया, मुंबई, औरंगाबाद आणि धुळे अशी प्रसूती करण्यात आली होती. कोरोना झालेल्या महिलेचीही प्रकृती उत्तर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बाळाचे वजन सुमारे साडे तीन किलो भरले असून, त्या नवजात बाळाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. परंतु बाळाची आई कोरोनाबाधित असल्याने बाळावर पुढचे काही दिवस नवजात शिशुकक्षात उपचार होणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.





CoronaVirus Pregnant Women Care | कोरोनापासून गरोदर स्त्रियांनी कसा बचाव करावा? डॉ. नंदिता पालशेतकर यांच्याशी गप्पा


राज्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरात सर्वाधिक रुग्ण असून त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक पावले उचलली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण पुणे शहर मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलं आहे. पुढील सात दिवसात शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त सकाळी 10 ते 12 सुरु राहणार आहेत. पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 611 (पुणे , पुणे मनपा, पिंपरी- चिंचवड मिळून) वर पोहचली असून आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या :


Coronavirus | पुण्यातील कचरावेचक महिलेचं औदार्य, कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 15 हजारांची मदत