Chandrakant Patil : भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinv Snea : Shinde Group) युतीत (Chandrakant patil) जागा वाटपावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केलं होतं. पण अशी चर्चा आत्ताच करणं, गरजेचे नाही, असं म्हणत पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटलांनी रंगलेल्या विविध चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी भाजप विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांची नेहमीच तयारी करत असतं, आमची हीच तयारी शिवसेनेला उपयोगी ठरेल, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं. पिंपरी-चिंचवडमध्ये ते बोलत होते.


ते म्हणाले की, "भाजप कायम निवडणुकीची तयारी करत असते. एक निवडणूक संपताच दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागतं. भाजप विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजप कायमच तयारी करत असतं. यावेळी शिवसेनेला जेवढ्या जागा येतील त्या जागा आम्ही त्यांना देऊ."


संपावर सकारात्मक चर्चा करु...


आज संपाचा सहावा दिवस आहे. त्या अजूनही तोडगा निघाला नाहीये. यावर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. यासाठी तीन रिटायर्ड आयएएस अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. हा परीक्षांचा कालावधी आहे आणि यात रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे माझं अत्यावश्यक सेवेत येणाऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी काळ्या फिती लावून रुजू व्हावं. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की, त्यांनी कामावर परत रुजू व्हावं. 


बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते?


2024 विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया अभ्यास्वर्गास त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. भाजपने 240 जागा लढवण्याची तयारी केल्यामुळे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला फक्त 48 जागा येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 50 हून अधिक जागांसाठी चांगले उमेदवार नाहीत, असेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितलं. भाजप शिंदे गटाव्यतिरिक्त असलेले मित्रपक्ष आणि अपक्षांनाही काही जागा सोडणार आहेत. शिंदे गटाचे सध्या 40 आमदार असून काही अपक्ष आमदारही त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या जागा वगळता भाजप शिंदे गटासाठी जादा जागा सोडणार नाही, असे बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे.