Pune News : मित्रांसोबत धुळवडीचा आनंद घेण्यासाठी पोहोत पोहोत इंद्रायणी नदीच्या (Indrayani River) मधोमध गेलेल्या तिघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झालाय. त्यामुळे धुलवडीच्या सणाला गालबोट लागलं असून तीन तरण्याबांड मुलांनी जीव गमावलाय. दरम्यान, ऐन सणाच्या दिवशी तीन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वांकडून हळहळ व्यक्त होत आहे. 


पाण्याचा अंदाज न आल्याने 3 तरण्याबांड मुलांनी जीव गमावला


अधिकची माहिती अशी की, पुण्यातील देहूत धुलीवंदनाच्या दिवशी बुडून तिघांचा मृत्यू झालाय. इंद्रायणी नदीवर ही दुर्दैवी घटना घडली. घरकुल परिसरातील 10 ते 12 तरुण पोहण्यासाठी दुपारी देहूत गेले होते. चार वाजताच्या दरम्यान हे सगळे मित्र पाण्यात उतरले. मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास काहीजण पाण्याच्या मधोमध गेले, त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं काहीजण बुडाले. एकाला स्थानिकांनी वाचवले पण तिघांचा यात जीव गेलाय. मावळच्या वन्यजीव रक्षक पथकाने बचावकार्यात मदत केली.


रंगपंचमीच्या दिवशी एकाचा धरणात बुडून एकाचा मृत्यू तर एकाचा शोध सुरू


धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या पाच जणांपैकी एकाच बुडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या डोंगरखर्डा इथून जवळ असलेल्या खोरद येथील धरणावर घडली. आठ जण पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी पाच जण अचानक बुडायला लागले त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले तर दोन मावस होते यात एकाच मृत्यू झाला तर एकाचा शोध सुरू आहे.  बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी दोघांची नावे आहे. ते दोघे अरुण भोईर यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. दरम्यान बोटीच्या सहाय्याने पाच पैकी तिघांना वाचविण्यात यश आले. शोध मोहिमेदरम्यान मृतक पंकज झाडे याचा मृतदेह मिळाला असून जयंत धानफुले यांचा मृतदेह मिळालेला नाही. अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.


धुळवड साजरी करुन घरी परतत असलेल्या दोघांचा अपघाती मृत्यू 


होळी, धुळवड साजरी करून घरी येत असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भारुड गावाच्या हद्दीत दुचाकीचा अपघात होऊन मामा भाच्च्याचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. शिरसाट वज्रेश्वरी मार्गावरील येणाऱ्या गावातील प्रल्हाद माळी( वय 24) हा व त्याच्या बहिणीचा मुलगा मनोज जोगारी वय (20) हे दोघे होळी दहणाच्या कार्यक्रमासाठी ढेकाळे मनोर येथे गेले होते. दरम्यान सण साजरा केल्यानंतर ते दोघे यामाहा कंपनीच्या दुचाकीवरून अहमदाबाद महामार्गावरून शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास येत होते. महामार्गावर ढेकाळे येथे दुचाकी भरधाव वेगाने येत असताना लोखंडी ब्रीज जवळ दुचाकी वरील नियंत्रण गेल्याने दुचाकी दुभाजकाला धडकून दोघे  रस्त्यावर पडून जखमी झाले आणि यात दोघांचा मृत्यू झाला आहे.  सदर घटनेची माहिती मांडवी पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले व पुढील कारवाई करण्यात आली आहे. मामा भाच्च्याचा मृत्यू झाल्याने भिणार गावात शोककळा पसरली आहे.  या घटनेची नोंद मांडवी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास मांडवी पोलीस करीत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या


धक्कादायक! भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, भाईंदर परिसरात खळबळ, 2 जणांना अटक 


Barshi Crime News: 'भावाला खुन्नस देऊन बघतो...', रागातून तरुणावर चार जणांकडून जीवघेणा हल्ला, CCTV व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद