Conjunctivitis In Alandi: पुणे जिल्ह्यातील आळंदीकरांसाठी (Conjunctivitis In Alandi) महत्वाची बातमी आहे. आळंदीतील काही परिसरांमध्ये डोळ्यांच्या बुबुळाचा (डोळे) आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. आळंदीतील विविध संस्थानात राहणाऱ्या मुलांना बुबुळाचा प्रादुर्भाव झाला आहे. 4 दिवसांत 1560 रुग्ण समोर आली आहेत. त्यामुळे आळंदीत डोळ्यांच्या बुबुळाचा (डोळे) आजाराची (डोळे येण्याची) साथ पसरण्याची भीती आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. पावसाळ्यात विविध प्रादुर्भाव होत असतात. पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपालिकेच्या हद्दीत गेल्या चार दिवसांपासून डोळ्यांच्या बुबुळाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. सोमवारी डोळ्यांच्या बुबुळांची 450 रुग्ण समोर आली. त्यानंतर मंगळवारी 740 रुग्ण , बुधवारी 210 प्रकरणे आणि गुरुवारी 160 रुग्ण समोर आली आहे. या चार दिवसांत एकूण 1560 रुग्ण आढळून आली आहे.
आळंदी नगरपालिकेच्या हद्दीत ज्या विविध शैक्षणिक संस्था आहे. त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या बुबुळांचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. जिल्हा प्रशासनासमोर जेव्हा हा प्रकार आला, तेव्हा तात्काळ याची दखल घेण्यात आली आहे. सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. आज एनआयवीचे एक पथक सिव्हिल सर्जनसह आळंदीला भेट देणार आहे. तसेच पुढील उद्रेक टाळण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली.
आज आढळलेल्या नवीन रुग्णांची संख्या कमी झाली नाही, तर आम्ही शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव देऊ, असेही त्यांनी सांगितले. तसेच पिंपरी चिंचवड आणि लगतच्या ग्रामपंचायतींनाही सर्व घरांची तपासणी करण्यास सांगितले आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयात दोन नेत्रतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मुलांना केस पेपर फ्री केले आहेत. संस्था प्रमुखांना मुलांना घरी पाठवण्याबाबत बोललो आहोत, अशी माहितीही आयुष प्रसाद यांनी दिली.
वैद्यकीय पथके खडबडून झाली जागी...
या सगळ्या प्रकरणी वैद्यकीय पथके खडबडून झाली जागी झाली आहेत. प्रत्येक शाळा आणि बाकी ठिकाणी जाऊन ही पथकं मुलांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी वेगळी OPD ठेवण्यात आली आहे. सगळ्या मुलांची तपासणी करुन मुलांना औषधं , ड्रॉप देण्यात येत आहे. सगळ्या मुलांची योग्य पद्धतीने तपासणी केली जात आहे शिवाय पालकांना त्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.