पुणे : पुण्यात सध्या लागोपाठ खूनाचं सत्र सरु आहे. औंध भागात (Pune Murder news) आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची (Pune Crime News)  धक्कादायक घटना ताजी असतानाच आता पोटच्या पोरानेच आईचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील खडकी भागातील रेंज हिल परिसरातील घटना घडली आहे. गुंभाबाई शंकर पवार असे खून झालेल्या महिलेचे नावज्ञानेश्वर शंकर पवार असे आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पवार हा एका फॅक्टरी मध्ये काम करत असून तो त्याच्या आई सोबत खडकी भागात राहत होता. आज सकाळी त्याने आईच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करत खोलीचे बाहेरून लॉक लावून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांना संशय आल्यामुळे त्यांनी घराजवळ पाहिलं असता गुंभाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. नेमकी  ज्ञानेश्वर ने ही हत्या का केली? याचा शोध पोलीस घेत आहेत.


खूनाचं सत्र सुरुच


कालच (10 फेब्रुवारी) पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अनिल ढमाले असं आत्महत्या करणाऱ्याचे नाव होतं. आर्थिक वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गोळीबारात जखमी झालेल्या आकाश जाधवची प्रकृती गंभीर आहे. डोक्यात गोळी लागल्याने आकाश जाधव यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या जाधव हे अत्यावस्थ आहेत. जाधव यांचे बालेवाडी हाय स्ट्रीट येथे ज्वेलर्स चे मोठे दालन असून ढमाले याने अनेक महिन्यांचे भाडे थकीत ठेवलं होतं आणि यातूनच हा सगळा प्रकार घडल्याची माहिती आता समोर आली .


जिव्हाळा गेला कुठे?


पुण्यात सध्या गुन्हेगारी वाढत आहे. त्यात हत्येच्या घटनादेखील वाढत आहे. घरगुती वादातून एकमेकांचा सूड घेत थेट हत्या करत असल्याच्या घटना लागोपाठ पुढे येत आहे. या घटनांमुळे नात्यांमध्ये जिव्हाळा उरला आहे की नाही?, असा प्रश्न निर्माण होत आहे. गुन्हेगारी कुटुंबियांचाच जीव घेत असल्याचं दिसत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune News : पुण्यात कस्टम विभागाची मोठी कारवाई; भुवनेश्वर पुणे एक्स्प्रेसमधून 120 किलो गांजा जप्त, माहिती मिळताच प्लॅन उधळून लावला!