पुणे :  पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेकांना आपल्या लोकप्रतिनिधीचं शिक्षण किती आणि आपल्या लोकप्रतिनिधींकडे किती संपत्ती आहे लोकप्रतिनिधी किती श्रीमंत आहे. याची अनेकांना उत्सुकता लागली असते. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार पुणे लोकसभा मतदारसंघाचे क़ॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांकडे किती संपत्ती आहे पाहुयात...



- रविंद्र धंगेकर यांच्याकडे एकूण 4 कोटी 82 लाख 90 हजार रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. 


- पत्नीच्या नावे एकूण 3 कोटी 33 लाख 11 हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.


- धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 8 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता आहे. 


- धंगेकर यांच्या नावावर 35 लाख 73 हजार रुपयांचे कर्ज  आहे


- पत्नीच्या नावार 32 लाख 42 हजार रुपयांचे कर्ज  आहे.


-धंगेकर यांची मागील आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षात वार्षिक उत्पन्न 8 लाख 7 हजार रुपये आहे.


 - व्यवसाय शेती व सोने-चांदी कारागिरी असल्याचं प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. 


-रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे.


- धंगेकर यांच्याकडे रोख रक्कम 76 हजार रुपये आहेत. 


- पत्नीकडे रोख रक्कम 62 हजार रुपये आहे. 


-विविध बँकांमधील ठेवी, म्युच्युअल फंड एल आयसी मध्ये गुंतवणुक केली आहे.


 -या जंगम मालमत्तेची एकूण किंमत 23 लाख 26 हजार रुपये इतकी आहे. 
- पत्नीकडे 72 लाख 38 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. 


-एक अॅक्टिवा आणि एक बुलेट आहे.


 -10 तोळे सोनं आहे. त्याची किंमत 6 लाख 45 हजार आहे. 


-पत्नीकडे 15 तोळे आहे त्याची किंमत  9 लाख 67 हजार आहे. 


जमिन कुठे आणि किती आहे?


- दौंडमधे पिंपळगाव येथे सुमारे तीन एकर जमिन
-हवेलीमध्ये नांदोशी येथे 17 गुंठे जमिन आहे. (किंमत 86 लाख 58 हजार )
-रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे निवासी इमारतीमध्ये एकूण सहा मिळकती आहेत. 
-स्थावर मालमत्तेची एकूण किंमत 4 कोटी 59 लाख आहे. 
- पत्नीच्या नावाने सुमारे अडीच एकर जमिन असून त्याची किंमत 45 लाख 61 हजार आहे. 
-धंगेकर यांच्या पत्नीकडे 2कोटी 60 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 


एकूण आठ गुन्हे दाखल


शिवाजीनगर, समर्थ पोलिस स्टेशन, बंडगार्डन पोलिस स्टेशन. विश्रामबाग चतुश्रृंगी पोलिस स्टेशन आणि निगडी पोलिस स्टेशनमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


Sunetra Pawar : कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही; उमेदवारी अर्ज दाखल करताच सुनेत्रा पवारांचा फेसबुक पोस्टमधून रोष कुणावर?