पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातून दोन पैलवान( Pune Lok Sabha Constituency) लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप आणि कॉंग्रेस अशी लढत होणार आहे. दोन्ही उमेदवार तगडे असल्याने दोन्ही पक्षांकडून जोमात प्रचार सुरु आहे. जिंकण्यासाठी नियोजन केलं जात आहे. बैठकांवर बैठका घेतल्या जात आहे. पक्षाकडूनच उमेदवाराला त्रास होणार नाही शिवाय त्यांच्या नाराजीचा उमेदवाराच्या मतांवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रयत्न केलं जात आहे. 


 मात्र असं असलं तरीदेखील दोन्ही उमेदवार एकमेकांच्या बालेकिल्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. रवींद्र धंगेकर हे कोथरुडमध्ये कस लावत आहेत. तर मुरलीधर मोहोळ हे वडगावशेरी परिसरात जोर लावताना दिसत आहे. दोघांनाही मोठ्या मताधिक्यानं जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे. कारण शहरात असलेला संपर्क आणि प्रतिमा जपण्याचं आणि ती प्रतिमा तशीच कायम ठेवणं त्यांच्यासाठी महत्वाचं असणार आहे. 


भाजपकडून बैठका घेतल्या जात आहे. आणि त्यात सूचना दिल्या जात आहेत. सोबतच चंद्रकांत पाटलांनी देखील बैठका घेतल्या. त्यात ते म्हणाले की, विरोधकांकडे मुद्दे नसल्याने, ते राज्यघटना बदलाचा अपप्रचार करत आहेत. उलट कॉंग्रेसने स्वतः च्या स्वार्थासाठी 40 वेळा घटना बदल केला. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन हुकूमशाही आणली. त्यामुळे हे सर्व जनतेसमोर मांडून विरोधकांचे मुद्दे वेळीच खोडून काढा, असे आवाहन चंद्रकांत पाटलांनी बैठकीदरम्यान केलं आहे. कोविड काळात मुरलीधर मोहोळ यांनी महापौर नात्याने पुणे शहराला केले काम फारच परिणामकारक होते. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे पुणे शहराने कोविडवर यशस्वी मात केली. पुणेकरांना याची जाणीव आहे. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी आणि मुरलीधर मोहोळ यांना खासदार बनविण्यासाठी पुणेकर मतदान करणारच आहेत. पण तरीही कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना दिल्या. 


त्यानंतर कॉंग्रेसमध्येदेखील अनेकजण नाराज असल्याच्या चर्चा आहे. याच नाराजी लोकांचा फटका कॉंग्रेस उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे निवडणुकीत आणि प्रचारात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी कॉंग्रेसचं केंद्रीय पथक पुण्यात दाखल झालं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी जंग जंग पछाडताना दिसत आहे. सुक्ष्म नियोजन केलं जात आहे. त्यासोबतच प्रचाराची रणनिती आखली जात आहे. पुणेकर नेमकं कोणत्या उमेदवाराला पसंती  देतात, हे पाहणं सर्वात महत्वाचं असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Supriya Sule Whatsapp Status : सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस, पवारांच्या फोटोसोबत हार्ट इमोजी! म्हणतात 'कितीबी समोर येऊदे....'