पुणे : शिरुरमध्ये लोकसभा (Pune Shirur) निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. येथे सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. या जागेवर मविआतर्फे विद्यामान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) तर महायुतीतर्फे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना तिकीट देण्यात आलंय. हे दोन्ही नेते आता पूर्ण ताकदीने प्रचाराला लागले आहेत. अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतणीच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी वधू-वरांना आशीर्वाद देताना कोल्हे यांनी काहीशी राजकीय स्वरुपाची विधानं केली होती. त्यांच्या याच विधानांनंतर शिवाजीराव आढळराव पाटील आक्रमक झाले आहेत. आढळरावांच्या टीकेमुळे आता येथे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
अमोल कोल्हे वाचाळवीरांसारखं बरळले
अमोल कोल्हे 31 एप्रिल रोजी मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नाला गेले होते. त्यांनी तेते राजकीय भाष्य केलं होतं. याच भाष्यानंतर आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मंगलमय प्रसंगी कोल्हे वाचाळवीरांसारखं बरळले. लग्न म्हणजे हा आनंदाचा प्रसंग असतो. त्यामुळे अशा ठिकाणी राजकारणाची भाषा करणं हे शोभत नाही. असं बोलून उपस्थित लोकांच्या टाळ्या घेता येतात. मात्र हे संस्कृतीत बसत नाही. अमोल कोल्हे यांना अशी शिकवण कोणी दिली हे सांगता येणार नाही.
...हे बरं वाटत नाही- आढळराव पाटील
एखाद्याच्या लग्नाला जाऊन नम्रपणे त्यांना अभिवादन करांव. वधू-वरांना शुभेच्छा द्याव्यात. पण लग्नप्रसंगी जाऊन वाचाळवीरासारखं बरळायचं हे बरं वाटत नाही. येऊ शकतात.
अमोल कोल्हे काय म्हणाले होते?
अमोल कोल्हे यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतणीच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी कोल्हे यांनी राष्ट्रवदी पक्षफुटीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या निवडणूक चिन्हांची सांगड घालत, एका प्रकारे आपला प्रचारच केला. लग्नसोहळ्याला येण्यासाठी कोल्हे यांना उशीर झाला होता. हाच सदर्भ घेत वधू-वरांना आशीर्वाद देताना 'घड्याळ निघून गेल्याने वेळ जुळत नाहीये. पण पण वधू-वराच्या आयुष्यात सुखाची-समाधानाची तुतारी वाजावी', असं अमोल कोल्हे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. आता आढळरावांनी लक्ष्य केल्यामुळे अमोल कोल्हे काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
हेही वाचा >>