पुणे : पुण्यात कॉंग्रेसमध्ये अनेक मुद्द्यांवरुन अंतर्गत धूसफूस सुरुच असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) प्रचारासाठी किंवा नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कॉंग्रेसचं (Pune Congress) नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक ट्रस्टने दिलेल्या पुरस्कारावरून नाराजी नाट्य रंगल्याची माहिती आहे. 


नेमकं काय घडलं?


रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराची आखणी करण्यासाठी कसबा मतदार संघाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत धंगेकर यांना कसब्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार या बैठकीत महाविकास आणि  इंडिया आघाडीच्या कार्यकत्यांनी केला. पुण्याच्या केसरी वाड्यात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. रोहित पवार या बैठकीला आले आणि त्याचवेळी कॉंग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी निघून गेले. टिळक कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिला. त्यांच्यासोबत मंच शेअर केला आणि आता त्याच मोदींच्या विरोधात मतं कशी मागणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केल्याची माहिती आहे.


कसबा मतदार संघासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कसबा मतदार संघात रवींद्र धंगेकर यांचा दांडगा संपर्क आहे. त्यातच कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी रवींद्र धंगेकरांनी भाजपला 40 वर्षांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि निवडून आले. त्यामुळे कसबा म्हटलं की रवींद्र धंगेकर असं समीकरण झालं आहे. यंदा कसबा पॅटर्न पुण्यात चालवण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे. भाजपच्या मुरलीधर मोहोळांना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसकडून बैठका घेतल्या जात आहेत. 


पुण्यातील कॉंग्रेसमध्ये मागील काही महिन्यांपासून अंतर्गत धूसफूस असल्याचं दिसत आहे. कॉंग्रेसच्या अंतर्गंत नाराजीमुळे रवींद्र धंगेकरांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच रवींद्र धंगेकरांना फटका बसू नये, यासाठी कॉंग्रेसचं केंद्रीय पथक पुण्यात दाखल झालं आहे. कॉंग्रेसमधील नाराजी नाट्य शमवण्याचे प्रयत्न या पथकाकडून केले जात आहे. 


पुण्यात तगडी लढत


पुण्यात यंदा तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचितकडून वसंत मोरे उभे आहेत. त्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. या तिन्ही उमेदवारांकडून मीच खासदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता पुणेकर कोणाला पसंती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Lok Sabha Election 2024 : खासदाराने आमच्या  शेतकरी बापाला  कधी विचारलं का? पहिलंच मत त्यांना कसं देणार?; नव्या मतदारांचे लोकप्रतिनिधींंवर ताशेरे