पुणे :  भाजपने (BJP) लोकसभेसाठीच्या (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) 20 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपने मुरलीधर मोहोळ  (Muralidhar Mohol)l) यांना खासदारकीसाठी तिकीट दिलं आहे. पुण्याचे माजी महापौर, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. मुरलीधर मोहोळांना उमेदवारी देऊन भाजपने पहिला डाव टाकला आहे. मात्र आता कॉंग्रेसकडून कोणता उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या विरोधात उभा ठाकणार आहे, याची आता प्रतिक्षा आहे. 


भाजपने पहिले आपला उमेदवार पुणेकरांसमोर आणला. पुणेकरांच्या ओळखीचा उमेदवार भाजपने दिला. त्यासोबतच आता महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसला सोडली जाणार आहे. मात्र भाजप प्रमाणेच कॉग्रेसमध्येही उमेदवारांच्या इच्छूकांची मोठी रांग आहे. त्यात आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), माजी आमदार मोहन जोशी आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे ही नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहे. त्यात रविंद्र धंगेकरांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा कसबा मतदार संघ म्हणजेच  बालेकिल्ला काबीज केला. त्यामुळे रविंद्र धंगेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. 


काम करणारा माणूस अशी ओळख असलेल्या रवींद्र धंगेकरांच्या प्रतिमेचा शहरभर विस्तार करून मतदारांना साकडं घालण्याचा कॉंग्रेस प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. त्यातच पुणे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकरांना मिळालेला पाठिंबा. त्यांची मतदारांमध्ये असलेली क्रेझ पाहून कॉंग्रेस त्यांना उमेदवारी देऊ शकते. त्यातच सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपला पाडण्याची ताकद असलेला उमेदवारही त्यांना म्हटलं जातं. कसबा विधानसभेच्या वेळी त्यांची ताकद सर्वांनी पाहिली.  मात्र त्यांच्यासोबतच मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांचीदेखील नावं चर्चेत आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेमकी कोणाला उमेदवारी घोषित करतात, हे पाहणं महत्वाचं आहे. 


लढणार आणि जिंकणार?


रविंद्र धंगेकरांना यापूर्वी अनेकांनी लोकसभेला लढणार का?, असा प्रश्न विचारला आहे. मात्र त्यावेळी धंगेकरांनी मला लोकसभा निवडणूक लढायची नाही, असं अगदी सुरुवातीला सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली. भाजपचा कोणताही उमेदवार समोर येऊ दे. पण पक्षाने जर संधी दिली तर मी नक्की पुण्याचा खासदार होणार असं ते म्हणाले आहेत. त्यासोबतच संधी दिल्यावर काहीही झालं तरी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा दावाही त्यांनी केला आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Lok Sabha constituency : गिरीश बापटांच्या मतदारसंघात कोण बाजी मारणार? रविंद्र धंगेकर पुन्हा मैदानात उतरणार?