Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीसोबत आले, पण ज्या त्रासाला कंटाळून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली, तोच त्रास पुन्हा होत असल्याचं विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले आहेत. अजित पवारांना शह देण्यासाठी 2024 च्या निवडणुकीत पवारांच्या विरोधातला जनतेच्या मनातला उमेदवार म्हणून उभा राहणार असल्याचं विजय शिवतारेंनी सांगितलं आहे. बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Constituency) शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं शिवतारे यांनी जाहीर केलं आहे. (Vijay Shivtare will be an independent candidate for the Baramati Lok Sabha)


बारामती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत


बारामती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार हे निश्चित. विजय शिवतारे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. पवारांच्या विरोधात ही आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आणि महायुतीतला तिढा आणखी वाढला.


विजय शिवतारे बदला घेण्याच्या तयारीत


2019 च्या निवडणुकीत विजय शिवतारे यांना अजित पवारांनी सांगून पाडलं होतं. त्याच्या बदला घेण्याच्या तयारीत विजय शिवतारे आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांनी घेतली. त्यावेळी याच विजय शिवतारे यांनी त्यांचं महायुतीत स्वागत केलं होतं. परंतु आगामी लोकसभेच्या निवडणुकीत विजय शिवतारे हे अजित पवारांचा प्रचार अजित पवारांच्या विरोधात उभे राहतील, हे मात्र कुणालाही ठाऊक नव्हतं.


विजय शिवतारे अपक्ष लढणार


2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार विरुद्ध  विजय शिवतारे अशी लढत होऊ शकते. 2 मार्चच्या नमो रोजगार मेळाव्यात विजय शिवतारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं स्वागत करण्यासाठी आले होते. पण ज्यावेळी अजित पवार विमानतळावरती आले, त्यावेळी अजित पवारांनी त्यांना इग्नोर केलं आणि त्याचा राग विजय शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांना आला आणि ही अजित पवारांची मस्ती जिरवायला पाहिजे, असं विजय शिवतारे यांचा कार्यकर्ता विजय शिवतारे यांना म्हणाला आणि त्याचाच फायदा घेत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं.


विजय शिवतारे यांच्या या भूमिकेने महायुतीत अलबेला नाही, हे समोर येतानाच मात्र, महायुतीच्या उमेदवाराची आगामी काळात दमच्याक होणार हे मात्र नक्की.