Pune Lockdown : राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यातील शाळा, महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.
रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत पुन्हा संचारबंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.
नियमांचे पालन करुन अभ्यासिका सुरु राहणार !
शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अभ्यासिका सुरुच ठेवण्यात येणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भातील नियमावलीची कडक अंमलबजावणी करुन ही परवानगी देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
CoronaVirus Lockdown | लॉकडाऊनसंदर्भातील अफवा पसरवाल, तर दंडात्मक कारवाई
'लॉकडाऊन' नाही, पण मायक्रो कंटेन्मेंट झोनचा विचार !
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी ती नियंत्रणात आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा तूर्त कोणताही विचार नाही. मात्र मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येत आहे.
लग्न, समारंभास केवळ 200 जणांची उपस्थिती
विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न, समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Mumbai Corona : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे BMC अलर्ट मोडवर, कारवाईचा धडाका, हजारांहून अधिक इमारती सील
ग्रामीण भागातील बंद अवस्थेत असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार
पुण्याच्या ग्रामीण भागातील बंद अवस्थेत असलेले कोविड केअर सेंटर लगेच सुरू करण्यात येणार आहेत..पुण्यातील बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येतील..गरज भासल्यास जम्बो हॉस्पिटलही पुन्हा सुरू करण्यात येईल.