Pune News :  सध्या सगळीकडे सोशल मीडिया (Pune) आणि मोबाईलचा (Mobile) अतिवापर होताना दिसत आहे. अनेकांचं मानसिक आरोग्य धोक्यात आलं आहे.  यामुळे यंदा दगडूशेठ गणपती (dagdusheth ganpati temple) मंदिरात गणपतीचा आशिर्वाद घेत विद्यार्थ्यांनी डिजिटल व्यसनमुक्तीचा संकल्प केला आहे.  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजिक गणपती ट्रस्ट आणि टाकळकर क्लासच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत डिजिटल व्यसनमुक्तीचा (digital detox) संकल्प केला आहे.


काय केला संकल्प?


'डिजिटल व्यसनमुक्तीचा नववर्षी निर्धार...दगडूशेठ गणपती बाप्पाचा आशीर्वाद हाच आम्हाला आधार रात्रीचा करीती दिवस कारणे फेसबुक, इन्स्टा, व्हाट्सअप, नेटफ्लिक्स मग दिवसभराचा आळस करशील कधी रे अभ्यास', असे डिजिटल व्यसनमुक्तीचे गांभीर्य सांगत व्यसनमुक्तीचा निर्धार करून चांगल्या भारताची निर्मिती करण्यात माझे योगदान देईल, असा संकल्प दगडूशेठ बाप्पांच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी केला.


शेकडो विद्यार्थी मंदिरात...


हा डिजिटल व्यसनमुक्ती उपक्रम विद्यार्थ्यांसोबत राबविण्यात आला.यावेळी दगडूशेठ गणपती मंदिराच्या येथे शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी जमले होते. विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून डिजिटल व्यसनमुक्तीचा संदेश दिला. उपक्रमाची सुरुवात अथर्वशीर्ष पठणाने करण्यात आली.  निर्धार व्यसनमुक्तीचा...संकल्प नववर्षाचा,आशीर्वाद त्याला दगडूशेठ गणपती बाप्पाचा, अशी प्रतिज्ञा विद्यार्थांनी यावेळी केली. वर्षांच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी डिजिटल व्यसनमुक्तीचा संकल्प करुन सकारात्मक मार्ग दाखवून दिला आहे. नवीन कार्य करण्याची प्रेरणा गणपती बाप्पांनी विद्यार्थ्याना दिली आहे. डिजिटल व्यसनमुक्तीच्या मार्गाचे अनुकरण केले तर नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल असा हा उपक्रम आहे,असं पालकांनी सांगितलं आहे. 


विद्यार्थ्यांना फक्त गुण मिळवून देणे पुरेसे नाही. गुणांना मूल्यांची जोड द्यायला हवी.  विद्यार्थी डिजिटल व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत. डिजिटल व्यसनमुक्ती इतर कोणत्याही व्यसनापेक्षा अधिक गंभीर आहे. त्याची जाणीव लोकांना व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लहापणापासूनच मुले या डिजिटल व्यसनाला बळी पडतात, त्यामुळे पालकांनी त्याचे गांभीर्य लवकर ओळखायला हवे, असाही संदेश यावेळी देण्यात आला. 


 डिजिटल व्यसनमुक्ती का गरजेची?
सध्या सगळीकडे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोशल मीडियाच्या वाढलेल्या वापरामुळे अनेक गुन्हे देखील घडताना दिसत आहे. पुण्यात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे. या सगळ्यांवर आळा घालण्यासाठी सोशल मीडियाचा कमी वापर होण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थांनी पुढाकार घेतला आहे. 'डिजिटल डिटॉक्स'देखील म्हटलं जातं. यामुळे मानसिक आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहेत. त्यामुळे  डिजिटल व्यसनमुक्तीची गरज आहे.