Ichalkaranji Girls picnic bus accident in Baramati : सहलीवरून परत येत असताना अपघात झालेल्या बसमधील मुली मुलींवर उपचार करून त्यांना इचलकरंजीला सुखरूप रवाना करण्यात आले आहे. बारामती जवळ पाहुणेवाडी गावच्या हद्दीत आज पहाटे तीनच्या सुमारास मुलींच्या बसचा अपघात झाला. त्यानंतर त्यांना बारामतीच्या महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 24 मुली किरकोळ जखमी झाल्या होत्या, तर 3 मुलींना गंभीर दुखापत झाली आहे. बसमध्ये एकूण 48 मुली व 5 स्टाफ मेंबर यांचा समावेश होता.
अपघाताची माहिती मिळतात विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने जखमी मुलींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. गंभीर जखमी असलेल्या एका मुलीला पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. एका मुलीला रुग्णवाहिकेतून इचलकरंजीला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने मुलींसाठी शिवशाही बस उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय या मुलींना अल्पोपहार आणि गुलाब पुष्प देऊन रवाना करण्यात आले आहे.
Ichalkaranji Girls picnic bus accident in Baramati : नेमका कसा झाला अपघात?
शिर्डीवरून इचलकरंजीला परतीचा प्रवास करताना बारामती तालुक्यातील पाहुणेवाडीत अपघात झाला. बारामती मार्गे फलटणच्या दिशेने जाताना समोरून आलेल्या वाहनाला चुकवीताना बसच्या चालकाच्या डोळ्यावर समोर येणाऱ्या वाहनाचा प्रकाश पडल्याने अंदाज न आल्याने पुलावरून कोसळळी. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमी मुलींसह चालक व पाच स्टाफ मेंबर यांना स्थानिक रहिवासी व पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी बारामती येथील शासकीय महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Ichalkaranji Girls picnic bus accident in Baramati : पालकांची पळापळ
खासगी क्लासने आयोजित केलेल्या मुलींच्या सहलींच्या बसला अपघात झाल्याचे समजताच पालकांची चांगलीच भंबेरी उडाली. घरी माहिती मिळताच पालकांनी तातडीने बारामतीकडे धाव घेतली. सागर क्लासेसच्या बाहेरही पालकांनी मोठी गर्दी केली होती. इचलकरंजी येथील सागर क्लासेस 8 वी ते 10 वीच्या क्लासमधील मुलींची औरंगाबाद, दौलताबाद, वेऊळ, शिर्डी, शनी शिंगणापूर या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
जखमींची आमदार रोहित पवारांकडून विचारपूस
मुलींच्या सहलीच्या बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. रोहित पवार यांनी मुलींची भेट घेत डॉक्टरांशी चर्चा केली. विद्यार्थिनींना चांगले उपचार देण्याच्या सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या