पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून कोणाला उमेदवारी (Pune loksabha 2024) मिळणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक या दोन नावांची चर्चा होती. त्यात मुरलीधर मोहोळांना (Muralidhar Mohol) उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर जगदीश मुळीक  (Jagdish Mulik) यावर कोणती प्रतिक्रिया देणार किंवा कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वाचं लक्ष होतं. त्यात आता जगदीश मुळीकांनी फेसबुक पोस्ट करत आपली भूमिका  मांडली आहे. कोणतेही पद नसतानाही माझ्या साठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे, असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 


या पोस्टमधून जगदीश मुळीकांनी पुणेकरांचे आभार मानले आहे. त्यासोबतच पद असो किंवा नसो म्हणत त्यांनी शहरासंदर्भात असलेली जबाबदारी पार पाडणार असं सांगितलं आहे आणि कायम पुणेकरांच्या सेवेत असेल, असाची विश्वास त्यांनी पुणेकरांना दिला आहे. 


दोघांमध्ये इव्हेंट वॉर


मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये लोकसभेच्या तिकीटावरून रस्सीखेच सुरु असल्याचं सांगण्यात येत होते. हेच नाही तर मोहोळ आणि मुळीक या दोन्ही नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. त्यांच्या समर्थकांकडून अनेक वेळा भावी खासदारांचे बॅनरदेखील लावण्यात आले होते. त्यानंतर दोघांनी पुणे शहरात काही धार्मिक एव्हेंट घेतले. पुणेकरांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये इव्हेंट वॉर सुरु होते.  अनेक मुद्यांवरुन वाद सुरु असल्याचं बोललं जात होतं. 



फडणवीसांची भेट घेतली पण...


मुरलीधर मोहोळांचं नाव संभाव्य यादीत आल्यानंतर जगदीश मुळीकांनी हालचाली सुरु केल्या होत्या. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांची मुंबईत जाऊन भेट घेतली होती. पुण्यातील मुद्दे सांगितले होते. सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस आणि जगदीश मुळीक यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर या जागेसंदर्भात पुन्हा चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र तरीही भाजपने जाहीर केलेल्या यादीत मुरलीधर मोहोळांच्या नावची घोषणा करण्यात आली. त्यानंतर मुळीकांनी पुणेकरांचे आभार मानले. 


जगदीश मुळीकांनी फेसबूक पोस्टमध्ये काय लिहिलंय?


जनतेच्या सेवेत कायमच!
कोणतेही पद नसतानाही माझ्या साठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. 
जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी  आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे.
पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद.
आपलाच
जगदीश मुळीक


 


 


इतर महत्वाची बातमी-


Who Is Murlidhar Mohol : सामान्य कार्यकर्ता, ते लोकसभेचा उमेदवार; मुरलीधर मोहोळ यांची राजकीय कारकीर्द!