पुणे : भाजपने (BJP) लोकसभेसाठीच्या(Pune loksabha 2024) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) 20 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपने मुरलीधर मोहोळ  (Murlidhar Mohol) यांना खासदारकीसाठी तिकीट दिलं आहे. जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ या दोघांपैकी कोणाला भाज उमेदवारी देणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. त्यात आता मुरलीधर मोहोळांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. कोणत्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना कार्यकर्ता ते लोकसभेचा उमेदवार ही संधी मला दिली. भाजप हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली. मात्र त्यांनी समान्य कार्यकर्ता, पुण्याचे महापौर ते लोकसभेचा उमेदवार असा त्यांचा राजकीय आलेख राहिला आहे. 


पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळांची नियुक्ती करण्यात आली. मुरलीधर मोहोळ यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या सक्रिय सहभाग होता. या निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी मतदार संघाचे दौरे केले. केंद्रीय मंत्री अमित शहांनीदेखील यांनीदेखील मतदार संघाचा दौरा केला होता. या सगळ्या दरम्यान मुरलीधर मोहोळ सक्रीयपणे सहभागी होते. त्यासोबतच पुणे आणि आजुबाजूच्या गावांमध्येही भाजपची ताकद आहे. ही ताकडद पुन्हा घट्ट करण्यासाठी मोहोळांनी प्रयत्न केले आहे. शिवाय ते देवेंद्र फडणवीसांच्यादेखील जवळचे मानले जातात.


मुरलीधर मोहोळांची राजकीय कारकीर्द?



  • पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी 2002, 2007, 2012 आणि 2017 झाले आहेत

  • 2019- 2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते.

  • उपाध्यक्ष, अखिल भारतीय महापौर परिषद 

  • पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष 2017-2018

  • संचालक, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) -2017-2018

  • संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) 2017-2018

  • सभासद, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) 2017-2018

  • 2009 मध्ये खडकवासला (पुणे) मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार 


सामान्य जनता ते पक्षश्रेष्ठी; सगळ्यांमध्ये दांडगा संपर्क 


मुरलीधर मोहोळांनी कोरोना काळात मोठी कामगिरी बजावली. पुण्यात कोरोनाची महामारी असताना ते जनतेत उतरले आणि पुण्यातील कोरोना परिस्थिती उत्तम हाताळली. त्यावेळी ते महापालिकेचे महापौर होते. सोबतच भाजपच्या पक्षश्रेष्ठीसोबत दांडगा आहे. 


इतर महत्वाची बातमी-


-Pune Lok Sabha constituency : पुण्यात भाजपनं पहिला डाव टाकला; आता काँग्रेसची बारी, 'मविआ'चा उमेदवार कोण असेल?


-Pune Lok Sabha constituency : गिरीश बापटांच्या मतदारसंघात कोण बाजी मारणार? रविंद्र धंगेकर पुन्हा मैदानात उतरणार?