Pune Hit and Run: पुण्यात काही दिवसांपुर्वीच कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणाने पुण्यासह राज्याला हादरवून सोडलं. अशातच पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड मध्ये पुन्हा एकदा हिट अँड रन (Pune Hit And Run) प्रकरण समोर आलं आहे. पिंपळे गुरव पोलीस चौकीच्या समोरच हा अपघात झाला आहे. कारचालकाने दुचाकीसह चालकाला काही फूट अंतरावर फरपटत नेल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात 7 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होताना दिसत आहे. दोन दिवसानंतर या प्रकरणी सांगवी पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. अपघात ग्रस्त कार आणि कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video Viral) कैद झाली आहे. जेव्हा कारचालक दुचाकीसह चालकाला फरफटत नेत होता तेव्हा आजुबाजूचे लोक कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली आहे. चारचाकीचा चालक हा मद्यधुंद असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. घटनेच्या थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या तो तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 




घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल


पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे हिट अँड रनची (Hit And Run) घटना घडली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर आता अनेक जण संताप व्यक्त करत आहेत. 


कल्याणीनगरमधील हिट अँड रनच्या घटनेने पुणे हादरलं


18 मे रोजी रात्री उशिरा पुण्यातील कल्याणीनगर भागात एक भीषण अपघात झाला. यामध्ये अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसह पोर्शे कारमधून पबमधून नशेच्या अवस्थेत घरी जात होता. यावेळी कार चालवताना त्याने रस्त्याने जाणाऱ्या अन्य एका दुचाकीला धडक (Hit And Run) दिली. या धडकेत दुचारीवरील तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अनेक प्रयत्न केले.