Pune Bus Fire News : पुण्यात बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे - सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बसने पेट (Pune Bus Fire News) घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे संपूर्ण नुकसान झाले आहे. संपूर्ण बस जळून (Pune Bus Fire News) खाक झाली आहे. बसमध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते.


भीषण आगीची (Pune Bus Fire News) ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे .या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबाद वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बस मध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करीत होते. सर्वजण सुखरूप आहेत.


या आगीत बसचे मोठ्या प्रमाणावर पूर्ण नुकसान झाले असून पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या वेळी महामार्ग दोन्ही बाजुंनी बंद ठेवण्यात आला होता. कदम वस्ती ग्रामपंचायत या ठिकाणी गाडीचा टायर फुटला त्यानंतर गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले असून पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. 


गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहे. भीषण बस (Pune Bus Fire News) दुर्घटनेमध्ये अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज या बसने पेट (Pune Bus Fire News) घेतला तेव्हा वाहन चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना आरडाओरडा करत खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर काही क्षणात संपूर्ण बस पेटली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे धाव घेतली. लगेचच त्यांनी आग आटोक्यात आणली आहे.