पुणे: पुण्यातील आयटी हब हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सच्या जळीत कांडाने धक्कादायक वळण घेतलं आहे. तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं आणि हे कृत्य चालकाने केल्याचं तपासात उघड झालं आहे. मात्र, ज्यांना जीवे मारायचं होते, ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा यात बळी गेला आहे. दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामं सांगितली जात होती, म्हणून चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. या प्रकरणाने नेमकं वेगळं घेतलं आहे, या चालकाने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस चौकशीमध्ये त्याने सर्व माहिती दिली आहे.(Crime News Update)
हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सचे चालक जनार्धन हंबर्डेकर (Crime News Update) याने चौकशीमध्ये जे सांगितलं ते संतापजनक आहे. काही किरकोळ कारणावरुन आलेल्या रागाने गाडी पेटवून दिली आहे. घटनेनंतर पोलिसांना चालकाचा संशय आला होता. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर या घटनेमागचं कारण समोर आलेलं आहे. काल (गुरुवार, दि. 20) मार्च रोजी पोलिसांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन हिंजवडी हत्याकांडाबाबत माहिती दिली आहे.
चालकाला कशाचा आला होता राग?
हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सचे चालक जनार्धन हंबर्डेकर याने चौकशीमध्ये त्याला कोणत्या गोष्टींचा राग आला होता ते सांगितलं आहे. कंपनीतील काही कर्मचारी-अधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक आणि त्यामुळे चालकाच्या मनात राग आणि चीड निर्माण झाली होती. कंपनी व्यवस्थापनाने चालकाता दिवाळीत पगार कापला होता. त्याचबरोबर चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जात होती, व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती, असं त्याचं म्हणणं होतं. तर मागच्या आठवड्यामध्ये त्याला जेवणाचा डबा देखील खाऊ दिला नव्हता. या कारणांमुळे चालक जनार्धन हंबर्डेकर याचा कंपनीतील तिघांवर राग होता. त्या रागाचा बदला घेण्यासाठी त्याने कट रचला होता. परंतु या घटनेत नाहक ज्या चार जणांचा बळी गेला, त्यांच्यावर चालकाच रागच नव्हताच. ज्यांच्यावर राग होता ते या घटनेमध्ये बचावले आहेत. चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा बळी गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
टेम्पो ट्रॅव्हल्स जाळण्याचे कारण काय?
दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामे सांगितली जात होती. त्यामुळे टेम्पो चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने या घटनेवर हळहळ व्यक्त करणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते.
ते शेवटपर्यंत झगडले
गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते. ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. कोणीतरी त्या बंद दरवाज्याला ओरबाडून उघडायचा प्रयत्न केला होता. जीवाच्या अकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील. पण तो दरवाजा उघडला नाही. फुटलेल्या काचांवरही असेच निशाण होते. ते शेवटपर्यंत झगडले होते. या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे, जळालेल्या चपला दिसत होत्या. या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला आहे. गाडीच्या आतील धातू देखील वितळला आहे.
हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्समधील मृतांची आणि जखमींची नावं
-सुभाष भोसले, वय 42-शंकर शिंदे, वय 60-गुरुदास लोकरे, वय 40-राजू चव्हाण, वय 40, सर्व राहणार पुणे
जखमी-प्रदीप राऊत -प्रवीण निकम -चंद्रकांत मलजीत -संदीप शिंदे-विश्वनाथ झोरी-जनार्दन हंबारिडकर - टेम्पो चालक