पुणे: पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये (Pune Swarget Bus Depo Crime) एका 26 वर्षांच्या तरूणीवरती बलात्कार झाल्याची घटना घडली होती, त्या घटनेचे विधिमंडळात देखील पडसाद उमटले आहेत. पुणे बलात्कार (Pune Swarget Bus Depo Crime) प्रकरणी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने व विधिमंडळात कारवाईचे उत्तर दिलं असल्याने पुणे येथील सर्व मोठ्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. (Pune Swarget Bus Depo Crime) 

तडकाफडकी बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे1) अनघा शैलेश बारटक्के, प्रादेशिक व्यवस्थापक 2) श्रीकांत मुधकरराव गभणे, प्रादेशिक व्यवस्थापक3) प्रमोद संभाजी नेहूल, विभाग नियंत्रक4) अरुण भगतसिंग सिया, विभाग नियंत्रक 5)  पंकज गेणू ढावरे, यंत्र अभियंता 6) स्मिता सुरेश कुलकर्णी, अधिक्षक7) गिरिश वसंतराव यादव, वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी

या सर्व अधिकाऱ्यांची बदली प्रशासकीय कारणास्तव करण्यात येत असल्याने त्यांना नियमानुसार प्रवासभत्ता, दैनिकभत्ता, पदग्रहण अवधी इ. अनुज्ञेय राहील, असंही पत्रकामध्ये नमुद करण्यात आलं आहे. या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. 

काय आहे प्रकरण?

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर डेपोमध्येच (Pune Swarget Bus Depo Crime) असलेल्या शिवशाही बसमध्ये 25 फेब्रुवारीच्या पहाटे बलात्काराची घटना घडली होती. पुण्यामधून फलटणच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या तरुणीवर बलात्कार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली होती. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलीस शोध घेत होते. या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली होती.तर या प्रकरणातील आरोपी शिरूर तालुक्यातील त्याच्या गावातील एका ऊसाच्या शेतात लपून बसला होता. हा आरोपी स्वत:ला कंडक्टर भासवून पीडित महिलेला ताई म्हणून तिचा विश्वास मिळवला होता. आरोपीनेच ती बस दाखवली होती तसेच बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्यानं भासवलं होतं. मात्र, बस पूर्णपणे रिकामी होती.(Pune Swarget Bus Depo Crime) 

फिर्यादी तरूणीने बसमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता. मला बाहेर सोडा, अशीही विनंती तिने केली होती. मात्र, आरोपीने तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला आहे. यानंतर तो पळून गेला. पीडितेने नंतर मित्राच्या सांगण्यावरून फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल केला.हा आरोपी अत्यंत सराईत आहे. तो मोबाईल बंद करून फिरत होता. आजवर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.(Pune Swarget Bus Depo Crime)