Pune Crime News : लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर एक तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता अखेर या तरुणीचा मृतदेह (Crime News) पोलिसांना आढळून आला आहे. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडीत या तरुणीचा मृतदेह आढळला आहे. ही तरुणी पिंपरी-चिंचवड सांगवी येथील रहिवाशी असून मानसी प्रशांत गोविंदपुरकर असे तीचे नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. तर ती 18 मार्च 2025 रोजी ती पिंपरीवरून लोहगडला गेली होती. सकाळी 8:56 वाजता लोहगडच्या तिकीट केंद्रावरील सीसीटीव्हीमध्ये ती एकटी दिसली होती. मात्र परतताना तिचा कुठलाही मागोवा लागला नव्हता.
मानसीची हत्या की आत्महत्या? गूढ कायम, तपास सुरु
दरम्यान, ही तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती कळताच ही बाब पोलिसांना कळवण्यात आली आणि लोणावळा ग्रामीण पोलीस व तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र परिसरात ती कुठेही आढळून न आल्याने लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कु टीमला तिचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आलं. या तपासात मानसीचा मृतदेह एका झाडीत आढळुन आलाय. शिवदुर्ग रेस्कु टीमने स्ट्रेचरद्वारे हा मृतदेह बाहेर काढून लोणावळा ग्रामीण पोलीस आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र मानसीने आत्महत्या केली की हा अपघात होता, याचा तपास सध्या पोलीस करत आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
रायगडावरून पाय घसरून पडल्याने एका भीम अनुयायीचा मृत्यू
किल्ले रायगडावर पर्यटनासाठी आलेल्या एका भीम अनुयायीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. भीमराव अडकुजी घायवन (वय वर्ष 64), राहणार उरळी कांचन पुणे, असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते आपल्या 43 भीम अनुयायी सोबत काल (20 मार्च) चवदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. यानंतर हे सर्व भीम अनुयायी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी गेले असता यातील भीमराव घायवन यांचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या