Pune Rain Update: खडकवासला धरणातून 45 हजार पाण्याचा विसर्ग वाढवणार; नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

Pune Rain Update :  पुण्यात धरण परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. खडकवासाला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. प्रशासन अलर्ट मोडवर असून लष्कर तैनात करण्यात आले आहे.

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 04 Aug 2024 04:43 PM
Pune Rain : खडकवासला धरणातून खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार, पावसाचा जोर ओसरल्याने काहीसा दिलासा

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 35002 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो सायंकाळी 05:00 वा. 45705 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती देण्यात आली आहे.

Pune Dam Water: खडकवासला विसर्ग सायंकाळी 45705 क्यूसेक्सने करणार, पावसाचा जोर ओसरला

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 35002 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो सायंकाळी 05:00 वा. 45705 क्यूसेक्स करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती खडकवासला पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

Pune Rain Update: सिंहगड परिसरातील एकता नगर परिसरातील पाण्याचा प्रवाह कमी; पावसाचा जोर काहीसा ओसरला

पुण्यातील सिंहगड परिसरातील एकता नगर परिसरातील पाण्याचा प्रवाह हळूहळू कमी होत आहे. शहर परिसरातील पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं दिसून येत आहे. 

Rain Update: जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम; घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अशातच मावळ तालुक्यातील तिकोणा (वितंगगड)किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडलीआहे. मात्र, दरड कोसळल्यानंतर सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Rain Update: भारतीय लष्कर दलातील 105 जवान पुण्यातील एकता नगर भागात तैनात

भारतीय लष्कर दलातील 105 जवान पुण्यातील एकता नगर भागात तैनात करण्यात आले आहे. भारतीय लष्कर दलाकडून या ठिकाणी बोट देखील आणण्यात आली आहे. सध्या खडकवासला धरणातून 35 हजार 36 पाण्याचा विसर्ग होत असल्याने खबरदारी म्हणून भारतीय लष्कराला या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जवानांकडून ट्यूब, बोट तसेच विविध सामग्री दाखल करण्यात आली आहे.

Pune Rain: धरणातून नदीत सध्या 35000 क्युसेक्स विसर्ग सुरू; पुण्यातील एकता नगर परिसरात पाणी शिरायला सुरुवात

खडकवासला धरणातून मुठा नदीत सध्या 35000 क्युसेक्स ने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. एकतानगर मधील द्वारका अपार्टमेंटचे पार्किंग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. एकतानगरमधील इतर सोसायटीच्या बाहेर सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे. भारतीय लष्कर जवान, अग्निशमन दल पोलीस कर्मचारी तसेच महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

Pune Flood : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात साचलं पाणी

 पुण्यात धरण परिसरात (Pune Rain News)  तुफान पाऊस सुरू आहे.  धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.दरम्यान पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.

Pune Rain Update: खडकवासला धरणातून विसर्ग सुरू; नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर करा : मुख्यमंत्री

 पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प , रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर,  बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री  शिंदे यांनी दिल्या आहेत.

Lonavala Rain: लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू; सकल भागात पाणी साचल्याने रस्ते झाले जलमय
लोणावळा परिसरात धोधो पाऊस सुरू असल्याने, सकल भागात पाणी साचल्याने रस्ते झाले जलमय झाले आहेत. नांगरगाव रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. बापदेव रोड व नारायणी धाम मंदिरासमोरील रस्ता हा देखील पाण्याखाली गेला आहे. पांगारे वस्ती येथील राजू बोराटे यांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. जी वॉर्ड मधील निसर्ग नगरी मध्ये देखील पाणी घुसले आहे. वाकसई, कार्ला, मळवली, देवले परिसरात पाण्याचा विळखा पडला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.
Pune Rain Update: एकविरा आईच्या गडावर पावसाचा हाहाकार, धबधबे वाहू लागले ओसंडून

पुण्यासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पुण्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. लोणावळ्यात पावसाचे प्रमाण वाढले असून भुशी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पावसाचे पाणी वेगाने वाहत असल्याने, लोणावळा पोलिसांनी सुरक्षेसाठी पर्यटकांना भुशी धरणावर जाण्यास मज्जाव केलाय त्यामुळे भुशी धरण परिसर निर्मनुष्य झाले असून, भुशी धरणाचे पांढरे शुभ्र पाणी वाहत असल्याचं चित्र भुशी धरणावर दिसून येत आहे.

Pune Rain :  खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग

Pune Rain :  खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसंच पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झालीय. सोसायटी मधील नागरिकांना बाहेर काढण्यात येतंय.

पार्श्वभूमी

Pune Rain Update :   पुणेकरांची चिंता वाढली आहे.   पुन्हा एकदा पावसाचा जोर  (Heavy Rain)  वाढला आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.   खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसंच पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात भारतीय लष्कर तैनात करण्यात येणार आहे..


पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे.  धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.   


Pune Rain Alert : मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.